banner ads

वाहून गेलेले पूल दुरुस्त करा जनसंपर्क तुटला लोकप्रतिनिधींची हलगर्जीपणा - विशाल गोर्डे

kopargaonsamachar
0

 वाहून गेलेले पूल दुरुस्त करा जनसंपर्क तुटला लोकप्रतिनिधींची हलगर्जीपणा - विशाल गोर्डे 


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
भोजडे परिसरातील कोळ नदीवरील जुना व नवीन पूल तसेच वारी येथील दोन गोडबोले गेट बंधारे आणि थोरवेसे बंधारा अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व प्रवाशांना प्रचंड हाल सहन करावे लागत आहेत. भोजडे शिवारात पूर्वीचा पूल जीर्ण झाल्यानंतर नव्याने तयार करण्यात आलेला पूल अलीकडेच झालेल्या प्रचंड पावसामुळे वाहून गेला असून त्यामुळे या भागाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे.  पूर्व भागाचा तालुका शी संपर्क तुटल्यामुळे नागरिक संतप्त असून लोकप्रतिनिधी साफ दुर्लक्ष करत असल्याचा संताप व्यक्त होतो आहे अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष विशाल गोर्डे यांनी दिली आहे.

त्याचप्रमाणे वारी परिसरातील माजी सभापती मच्छिंद्र पाटील टेके यांच्या शिवारातील कोळ नदीवरील दोन गोडबोले गेट बंधारे आणि थोरवेसे बंधारा देखील पावसाच्या तडाख्यामुळे वाहून गेले आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पाणीसाठा आणि सिंचनाच्या सोयीवर गंभीर परिणाम झाला आहे.

या परिस्थितीवर भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रशासनाकडे तात्काळ दुरुस्तीची मागणी करण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल संताप व्यक्त करत जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल उपस्थित केला आहे. तात्काळ पूल व बंधाऱ्यांची पुनर्बांधणी करून नागरिकांच्या अडचणी दूर करण्यात याव्यात, अशी एकमुखी मागणी होत आहे.नुकतेच संजीवनी महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे यांनीही या भागात पाहणी करून नागरिकांना भेडसावणाऱ्या या समस्येची तीव्रता प्रशासनाच्या लक्षात आणून दिली होती.
धोत्रे सरपंच प्रदीप चव्हाण, किरण चव्हाण, वाल्मीक बोराडे, कैलास सिनगर, प्रवीण चव्हाण,विजय आगवन, नामदेव चव्हाण,ज्ञानेश्वर चव्हाण, सुमित खरात, शैलेश सिनगर,सचिन सिनगर, व्यंकटराव धाट, अभय सिनगर, प्रबोध सिनगर, संजय सिनगर, सतीश देवकर, संतोष करडे आदींसह अनेकांनी हे निवेदन कोपरगाव तहसीलदार यांना दिले आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!