banner ads

संजीवनीच्या साईश्रध्दा सालमुठेच्या क्यू आर कोडची पेटंट नोंदणी

kopargaonsamachar
0

 संजीवनीच्या साईश्रध्दा सालमुठेच्या क्यू आर कोडची पेटंट नोंदणी


            जर्मणीच्या विद्यापीठामध्येही प्रवेश  घेण्यासाठी साईश्रध्दा प्रवेशपूर्व परीक्षा पात्र
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
 संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स  संचलित संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या इ. ११ वी सायन्स मध्ये शिकत  असलेल्या साईश्रध्दा अरविंद सालमुठे या विद्यार्थीनीच्या ‘इनोव्हेटीव ट्रान्सपोर्ट थ्रु क्युआर कोड इंटिग्रेशन’ या अभिनव संकल्पनेला भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाकडून अधिकृत पेटंट नोंदणी मिळाली आहे. तसेच तीने टेक्निकल युनिर्व्हसिटी ऑफ मुनिच, जर्मनी या जगप्रसिध्द विद्यापीठामध्ये ‘डेटा सायन्स, आर्टिफिशियल इंटिलिजंस, सायबर सिक्युरीटी एथिकल हॅकिंग’ या विषयांसाठी प्रवेश  घेण्यासाठी आवष्यक असलेली ‘आयआयटीएम बीएस क्वॉलिफायर’ परीक्षा यशस्वीरित्या उत्तिर्ण केली आहे. ही परीक्षा आयआयटी मद्रास तर्फे घेतली जाते व अत्यंत उच्च दर्जाची मानली जाते.

साईश्रध्दाला असा दुहेरी मुकूट परीधान करायला मिळाला असल्यामुळे तिच्या प्रतिभा संपन्नतेचे सर्व थरातुन अभिनंदन होत आहे, अशी  माहिती संजीवनी ज्यु. कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
            साईश्रध्दाने विकसीत केलेल्या क्युआर कोडच्या माध्यमातुन प्रवाशांना  बसची संपूर्ण माहिती अगदी सहजपणे उपलब्ध होत आहे. क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर उघडणाऱ्या  वेबसाईटवरून प्रथम प्रवासी प्रथम जिल्हा, नंतर तालुका निवडतात आणि त्यानंतर संबंधित तालुक्यातुन सुटणाऱ्या  सर्व बसेसची माहीती पाहु शकतात. यात बसची वेळ, मार्ग, किलोमिटर, बसचा प्रकार तसेच एसटी महामंडळाकडून देण्यात येणाऱ्या  प्रवासी योजना उपलब्ध आहेत. त्यामुळे प्रवासी आपला प्रवास एक दिवस आधिच नियोजीत करू शकतात. एका महिण्यात सुमारे ५० लाख लोक या क्युआर कोडचा उपयोग करतात.  हा क्युआर कोड सध्या अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांसाठी  लागु आहे, पुढे संपुर्ण महाराष्ट्रासाठी  लागु होईल. या अभिनव कार्यासाठी साईश्रध्दाला नोबल वर्ल्ड रेकॉर्डने ‘जगातील सर्वात लहान वयाची तंत्रज्ञानातील बालप्रतिभा’ आणि ‘सर्वात लहान पेटंट धारक’ असा मान दिला आहे.

साईश्रध्दाच्या दुसऱ्या उपलब्धीनुसार ती ११ वी व १२ वी संजीवनीमधुन पूर्ण करणार आहे. त्यानंतर आयआयटी मद्रास येथे बीएस ही पदवी प्राप्त करणार आहेे व त्यानंतर ती एमएस करण्यासाठी जर्मनीला जाणार आहे. तिच्या भविष्यातील शैक्षणिक  प्रवास इ.११ वीला असतनाच निश्चित  झाला आहे, याबध्दल कुतूहल निर्माण झाले आहे.
   संजीवनी शैक्षणिक  संकुलातील  सर्वच संस्थामध्ये विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी शिक्षण दिल्या जात नाही, मात्र विद्यार्थ्यामधिल इतर क्षमता व त्यांची आवड ओळखुन त्यांना विविध क्षेत्रात पारंगत केल्या जाते. याच अनुषंगाने  साईश्रध्दाची एआय मधिल आवड व तिची वेगळे काहीतरी करण्याची धडपड बघुन शिक्षकांनी तिला मदत केली. तिची आयआयटी मद्रास मध्ये बीएस करण्यासाठी निवड झाली असुन चार वर्षाच्या अभ्सासक्रमासाठी तिला ५० टक्के फी मध्ये सवलत मिळणार आहे. आणि त्यानंतर जर्मनीमध्ये एमएस (पदव्युत्तर पदवी) करण्यासाठी १०० टक्के स्कॉलरशिप  मिळणार आहे. यात मोफत राहण्याचाही समावेश  आहे, ही साईश्रध्दाची मोठी उपलब्धी आहे.-
अमित कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी.   
   संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे, प्राचार्या अनुश्रिता सिंह व उपप्राचार्य एम.के. सोनवणे यांनी साईश्रध्दा व तिचे मार्गदर्शक शिक्षक  प्रा. सागर निकम यांचे  अभिनंदन केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!