ऊसाबरोबरच अन्य पूरक शेती उत्पादनाकडे कोल्हे कारखान्याची पावले ---- बिपिनदादा कोल्हे
कोपरगाव -- लक्ष्मण वावरे दि.२५ आक्टोबर २०२५
साखर कारखानदारीत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी काळानुरूप बदल करत सहकारातुन शेतकरी व त्यावर अवलंबुन असणा-या सर्व घटकांच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले तोच वसा घेवुन सहकारासमोर निर्माण झालेले खाजगीचे आव्हान पेलण्यासाठी संजीवनी सज्ज असुन शेतक-यांना ऊसाबरोबरच मत्स्य, बांबु, मोत्याच्या शेतीतुन आर्थीक हातभार लागावा यासाठी पावले टाकण्यांस सुरूवात केल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी केले. लक्ष्मीला स्थीर करण्याचे काम शेतक-यांच्या हातात असुन त्यांनी ऊसाचे एकरी १०० ते १५० टनाबरोबरच अन्य पीक उत्पादन वाढवावे, ज्ञान हा संपन्नतेचा गाभा असुन शेतक-याबरोबरच सर्व घटकांनी आपापल्या मुलांना उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त करावे असेही ते म्हणांले.
सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे लक्ष्मीपुजन मंगळवारी बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते संपन्न झाले त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी कार्यकारी संचालक सुहास यादव यांनी प्रास्तविकात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याच्या प्रगतीचा आढावा दिला. उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, कामगारनेते मनोहर शिंदे, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे व सर्व संचालकांनी उपस्थितांचे स्वागत केले. कारखान्याच्या लेखा विभागाचे आर.टी. गवारे, संभाजी चव्हाण, संजय आभाळे, कैलास रक्ताटे यांना उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे यांच्या हस्ते रोख बक्षिसांचे वितरण करण्यांत आले.
बिपीनदादा कोल्हे पुढे म्हणाले की, यंदाचा दिपावली सण शेतक-यांसाठी काहीसा कठीण आहे. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह सर्वानाच फटका बसला त्यातुन सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊपमुख्यमंत्री अजित पवार, ऊपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याच्या सर्व मंत्रीमंडळाने प्रथमच ३७ हजार कोटींची तरतुद करून शेतक-यांना सावरण्याचे काम केले आहे.
यंदाचा साखर हंगाम अवघड आहे. अतिवृष्टीमुळे ऊस शेतातच आडवे झाले आहे, ऊत्पादनांत घट होणार आहे. एफआरपी वाढते आहे पण साखर विक्रीचे दर तसेच आहे. थेट ऊसाच्या रसापासुन उत्पादित इथेनॉलचे दर पडले आहे मात्र तांदुळ, मका, ग्रेन यापासुन तयार होणा-या इथेनॉलला जास्तीचा दर मिळत आहे त्यामुळे खाजगी कारखान्यांना त्याचा अधिकचा फायदा होत आहे. ऊस हे शाश्वत उत्पन्न देणारे पीक आहे तेंव्हा आई जशी आपल्या बाळाची काळजी घेते तसं शेतक-यांनी आपल्या ऊसाकडे लक्ष द्यावे. आडसाली लागवडी शेतक-यांनी वाढवाव्या. दहा गुंठ्यात २५ टन उत्पादन हे माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न होते तेंव्हा ते साकार करण्याची संधी ख-या अर्थाने सर्वांना उपलब्ध झाली आहे.
सहकारातुन शेतक-यांना सशक्त करणे हा विडा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी उचलत संजीवनीत १९८२.८३ मध्ये पहिला रासायनिक उपपदार्थ निर्मातीचा प्रकल्प साकारून यशस्वी केला. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. वसंतदादा पाटील यांच्या हस्ते अॅसिटीक अॅसिड प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. बायोगॅस, फार्मा, सहवीज निर्मीती, बायो कंपोस्ट, विविध उपपदार्थ निर्मीती यातुन संजीवनीने स्वतःचे वेगळेपण केंव्हाच सिध्द केले पण त्याची कधी जाहिरातबाजी केली नाही. डेक्कन शुगर, वसंतदादा शुगर, नॅशनल हेवी, साखर संघ, नॅशनल फेडरेशन यातुन संजीवनीबरोबरच देशातील साखर उद्योगाला प्रगतीचे धडे देण्यांत माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी मोलाची भूमिका बजावली आणि तत्कालीन संचालक, सभासद शेतक-यांच्या प्रामाणिक साथीमुळेच हे यश उभे राहिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनांतुन आम्हांला शिकायला मिळाले आता तिसरी पिढी विवेक कोल्हे यांच्या रूपाने सहकारासमोर निर्माण झालेली आव्हाने पार करण्यासाठी काम करत आहे याचे समाधान आहे. देशात सहकार तत्वावर पहिला बायो सीएनजी, पोटॅश खत प्रकल्प निर्मीतीच्या प्रकल्पाचे लोकार्पण केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झाले याचे विशेष कौतुक आहे. दिवसेंदिवस शेतक-यांची जमीन कमी होत आहे, तर वेगवेगळे उद्योग भराभर वाढत आहे, जीडीपी वाढतो आहे, शेतक-यांनी निष्ठा ठेवुन काम करावे, जमीनीला पायखत घालावे, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरावी, नव्या बदलांना आत्मसात करावे असेही ते शेवटी म्हणांले.
याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक त्र्यंबकराव सरोदे, पराग संधान, संजय होन, पांडुरंगशास्त्री शिंदे, विश्वासराव महाले, त्र्यंबकराव परजणे, शरद थोरात, आप्पासाहेब दवंगे, रमेश आभाळे, ज्ञानेश्वर परजणे, मनेष गाडे, ज्ञानदेव औताडे, संजय औताडे, बाळासाहेब वक्ते, बापूसाहेब बारहाते, तुळशीराम माळी, बाळासाहेब पानगव्हाणे, विलास वाबळे, सतीश आव्हाड, रमेश घोडेराव, कैलास माळी, निवृत्ती बनकर, प्रदिप नवले, सोपानराव पानगव्हाणे, अशोक औताडे, संदिप चव्हाण, डॉ. गुलाबराव वरकड, साहेबराव रोहोम, विजय रोहोम, नानासाहेब गव्हाणे, कैलास राहणे, वैभव आढाव, हरिभाऊ लकडे, हभप बाबुराव महाराज चांदगुडे, यादवराव संवत्सरकर, भिमा संवत्सरकर, डॉ. विजय काळे, कैलास संवत्सरकर, संभाजी बोरनारे, डी. पी. मोरे, शिवाजीराव कदम, उत्तम चरमळ, फकीरराव बोरणारे, बापूतात्या परजणे, रामदास शिंदे, राजेंद्र बागुल, विष्णुपंत क्षिरसागर, विवेक सोनवणे, रामदास शिंदे, उत्तमराव चरमळ, फकिर महंमद पहिलवान, खालीकभाई कुरेशी यांच्यासह विविध संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी संचालक मनेष गाडे यांनी आभार मानले.








