कोपरगांवात नवरात्र उत्सवात प्रबोधनाचा लोकजागर
श्री भवानी देवी मंदिरात केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगांव शहरातील श्री भवानी देवी मंदिरात स्टार महाराष्ट्राचे पुरस्कार प्राप्त, झी मराठी फेम, राष्ट्र शिवशाहीर सुनील चिंचोलीकर आणि कलापथक यांचा केंद्रीय संचार ब्यूरोचे पी. फणीकुमार यांचे मार्गदर्शनाखाली "स्वच्छता ही सेवा" २०२५ अंतर्गत देवीचा जागर आणि स्वच्छता समाजप्रबोधनाचा विशेष कार्यक्रम सादर करण्यात आला.
केंद्रीय संचार ब्यूरो, अहिल्यानगर, स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र हरीत सेना, सूर्यतेज संस्था, कोपरगांव
यांचे विशेष सहकार्याने आणि अंबिका तरुण मंडळ, कोपरगांव, श्रीमंत प्रगत शिवाजी रोड, कोपरगांव, विद्या प्रबोधिनी शाळा, कोपरगांव यांचे सहभागातून नवरात्र उत्सवाचे नवमी निमित्ताने बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी श्री भवानी देवी (गांव देवी) सभामंडप येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रारंभी श्री गणेश आणि देवीचा वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर संत गाडगेबाबा, संत तुकडोजी महाराज, महात्मा गांधी यांचे स्वच्छता आणि पर्यावरण विषयक केलेले कार्य शाहिरी पध्दतीने रचनेतून सादर केले.
श्री भवानी देवी मंदिर हे देवीची साडेतीन शक्तिपीठ रुप असलेले कोपरगांव शहरातील ऐतिहासिक महत्त्व असलेले एकमेव ठिकाण आहे. शंकराचार्य यांचेपासून अनेक संत-महंत देवीची भक्त येथे दर्शनासाठी आलेले आहे. नवरात्र उत्सव निमित्ताने येथे दरवर्षी पारंपरिक उत्सव असतो.
शिवशाहीर सुनील चिंचोलीकर, वाद्यवृंद कलाकार आणि सहभागी संस्थांचे स्वागत श्री भवानी देवी मंदिराचे सेवेकरी उषाताई गायकवाड, भालूकाका गायकवाड, विनायक गायकवाड, स्वच्छतादूत सुशांत घोडके, सूर्यतेज संस्थेच्या जेष्ठ सदस्या लताताई भामरे, वर्षा जाधव, श्रीमंत प्रगत शिवाजी रोड तरुण मंडळाचे संतोष साबळे, जनार्दन शिंदे, अंबिका तरुण मंडळाचे अध्यक्ष शुभम गायकवाड, विद्या प्रबोधिनी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रेय गवळी, सीमा हिरे उपस्थित होते.
कार्यक्रमास संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटाच्या अध्यक्षा रेणुका कोल्हे, राष्ट्रसेविका नानासाहेब बडदे, कला, क्रीडा संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण चंद्रे यांनी सदिच्छा भेट दिली.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिवशाहीर सुनील चिंचोलीकर कलापथक, श्री भवानी देवी मंदिर, अंबिका तरुण मंडळाच्या गोपीनाथ गायकवाड, कृष्णांगी गायकवाड, रुपाली गायकवाड,अभिषेक गायकवाड, प्रशांत गोसावी, शुभम तांबे, विद्या प्रबोधिनी शाळेच्या सिमा हिरे, विद्यादेवी लोखंडे, श्रध्दा शिंदे, आरती तरटे, श्रीमंत प्रगत शिवाजी रोड तरुण मंडळाचे गणेश थोरात, सोमेश शिंदे, सुदर्शन जाधव, गणेश बिडवे, रोहन पंडोरे यांचे सह सर्व भक्तांनी परिश्रम घेतले.
संबळ, मृदुंग, हार्मोनियम, टाळ, खंजिरी या पारंपरिक वाद्यासोबत देवीचा जागर आणि समाजप्रबोधनाचा कार्यक्रमात उपस्थित भारावून गेले. जोगवा आणि परडी रचनेवर उपस्थित विद्यार्थीनी आणि महिलांनी पारंपरिक पावलीचा ठेका धरत कार्यक्रमाची सांगता झाली.








