मा. आ.सौ.स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसानिमित्त रचला ग्रामीण प्रगतीचा नवा अध्याय
2 कोटी 61 लाखांचे कर्जवितरण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
मा. आ. सौ. स्नेहलता कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संजीवनी स्वयंसहायता महिला बचत गटांना तब्बल 2 कोटी 61 लाख रुपयांचे कर्जवितरण करण्यात आले. या अर्थपूर्ण उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा आणि ग्रामीण प्रगतीचा नवा अध्याय रचला गेला आहे.
संजीवनी उद्योग समूहाच्या सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे शेकडो महिलांना व्यवसाय विस्तार, आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबनाचा नवा आधार मिळणार आहे. ग्रामीण भागातील महिला उद्योजकतेला चालना देऊन स्वयंरोजगाराच्या संधींना नवे बळ देण्याचा हेतू या उपक्रमामागे आहे.
स्नेहलता कोल्हे यांनी आपल्या कार्यकाळात महिला बचत गट चळवळीला बळकटी देत महिलांच्या आत्मनिर्भरतेचा वसा जोपासला आहे. महिलांना केवळ आर्थिक नव्हे तर सामाजिक बळ देण्याचे त्यांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.
इतर क्षेत्रात काम करताना होणाऱ्या आनंदापेक्षाही अधिक समाधान महिलांना स्वावलंबी करताना मिळते, असे स्नेहलताताई यावेळी भावनिक शब्दांत म्हणाल्या. माझ्या सामाजिक राजकीय जीवनाची जडणघडण या महिला बचत गट चळवळीतून झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवशी हे कर्जवितरण करताना मला विशेष आनंद होत आहे.
या उपक्रमामुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवा वेग मिळणार आहे. वाढदिवसाचे औचित्य सामाजिक कार्याने अधिक अर्थपूर्ण आणि जनहितकारी ठरले आहे.मतदारसंघात हजारो नागरिक,पदाधिकारी कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित मान्यवरांनी कोल्हे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.