आ. काळे यांनी नैतिकता दाखवत आरोपी पी ए पोलिसांच्या स्वाधीन करावा - वैभव आढाव
फरार गुन्हेगाराला वाचवणारा आ.का कोण ?
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव शहरात ऐन नवरात्रीत दहशत पसरविण्याचा प्रयत्न करणारा आ. काळे यांचा स्विय्य सहाय्यक अरुण जोशी आणि त्याचे साथीदार भाऊ व पुतण्या यांनी गंभीर गुन्हा केला आहे.आपसातील भांडणाचा प्रकार होताना त्यांनी पोलिस अधिकाऱ्यावर देखील केलेली वागणूक कायद्याला मूठमाती देणारी आहे. काळे यांचा गुन्हेगार पी ए घटना घडून वीस दिवस झाले तरीही अद्याप फरार आहे त्याला जर कुणी पाठीशी घालत असतील तर तसे न करता नैतिकता दाखवत काळे यांनी पोलिसांकडे स्वाधीन करावे यासाठी आवाहन भाजपा शहराध्यक्ष वैभव आढाव यांनी केले आहे.नक्की या आरोपींचा बचाव करणारा आ.का कोण आहे असाही सवाल त्यांनी केला आहे.
अनेक गैरकृत्यात पी ए चे नाव अनेकदा येवूनही त्याच्यावर कार्यवाही काळे यांनी केली नाही अशी चर्चा आहे. कायद्याच्या रक्षकांना देखील सुरक्षित वाटू नये असा सत्तेचा गैरवापर केला जातो आहे.थेट पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रकार झाला ही घटना अतिशय निंदनीय आहे.जर पोलिसच सुरक्षित नाही तर सामान्य जनता कशी सुरक्षित राहणार अशी नाराजी नागरिक व्यक्त करत आहे.
सामान्य जनतेला जसा न्याय असतो तोच दगडफेक सारख्या गुन्ह्यात असणाऱ्या पी ए साठी दिला जावा. इतरांना अटक होते आणि हा गुन्हेगार पी ए फरार राहतो यावरून त्याला वाचवणारा आ.का कोण हे संशोधन करण्याची गरज आहे. सण उत्सवाच्या काळात बाजारपेठ सुरक्षित आणि सुखद राहावी यासाठी फरार गुन्हेगार पोलिसांनीही जेरबंद करावे अशी मागणी वैभव आढाव यांनी केली आहे.






