येसगावात २५ वर्षांनंतर पुन्हा शाळा भरली
कोपरगाव - लक्ष्मण वावरे दि.२६ आक्टोबर २०२५
शाळेतील सवंगडी, शाळेचा वर्ग, लाकडी बाक यांची आठवण प्रत्येकाच्या मनात आयुष्यभर घर करून असते. शाळा सोडल्यावर पुन्हा लाकडी बाकांवर बसण्याची इच्छा अनेकांच्या मनात वारंवार येतेच. म्हणूनच न्यू इंग्लिश स्कूल येसगाव विद्यालयातील २००१ च्या बॅचचे माजी विद्यार्थी स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने एकत्र आले होते. २५ वर्षांनी जुने सवंगडी पुन्हा भेटल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
या स्नेहमिलनाचे आयोजन शनिवार (२५ आक्टोबर ) शाळेच्या आवारातच करण्यात आले होते. सुमारे ६२ वर्गमित्रांनी हजेरी लावत जुना काळ पुन्हा अनुभवला कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा व कै.शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमा पुजनाने कार्यक्रमाची सुरुवात करन्यात आली आणि राष्ट्रगीत , प्रतिज्ञा घेत प्रार्थना करण्यात आली. २५ वर्षांनंतर विद्यार्थ्यांना शाळेचा अनुभव आला. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी खेळ खेळले, विद्यार्थी त्यांच्या वर्गात बसले आणि आठवणींना उजाळा दिला विद्यार्थ्यांनी शिक्षकांना फेटा बांधत शिक्षकांचाही सत्कार करून ऋण व्यक्त करण्यात येऊन विद्यार्थ्यांना भेटवस्तू दिल्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्याबद्दल मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवल्या विद्यार्थ्यांनी मनोगतात सांगितले की त्यांचे शिक्षक त्यांना कसे शिकवायचे कधीकधी शिक्षक त्यांना शिक्षा करायचे.
पण ते आमच्या सुधारणेसाठी होते असे विद्यार्थ्यांनी सांगितले. माजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पालकांची काळजी घेण्याबद्दल मार्गदर्शन केले. युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा विकसित करण्यात आली. सर्व माजी विद्यार्थ्यांनी त्यांचे खूप आभार मानले.
श्री वाबळे सर, श्री दवंगे सर, श्री पोटे सर, श्री नळे सर, श्री बंगाळ सर,श्री गरुटे सर, श्री दुबिले सर,
श्री असने सर, हे माजी शिक्षक उपस्थित होते.या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक श्री. ठाकरे सर,सहाय्यक शिक्षक रामदास गायकवाड, श्री. कदम सर, कृष्णा गायकवाड गौरव मुळे,श्री सोलसे काका उपस्थित होते .
या कार्यक्रमासाठी शाळेचे माजी विद्यार्थी प्रसाद भास्कर, वैभव कोल्हे, प्रवीण डुंबरे, मयूर देवकर, राजू तांबे, गोविंद वाळुंज,निरंजन पाटोळे, प्रकाश पाठक , कविता गायकवाड, रुपाली डांगे यांनी परिश्रम घेतले.या प्रसंगी माजी विद्यार्थ्यांनी भेटवस्तु म्हणुन शाळेला स्टेज आणि मॅट्स देण्याचा निर्णय घेतला.









