स्वच्छ मनाने यशस्वी वाटचाल करा... निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लिता सातपुते
स्वच्छता ही सेवा" निमित्ताने चित्रकला स्पर्धा पारितोषिक वितरण
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
शालेय शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी असणे महत्त्वाचे आहे. आरोग्य सोबत आपले मन नेहमी स्वच्छ ठेवून यशस्वी वाटचाल करा. असे आवाहन निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी एका कार्यक्रमात केले.
केंद्रीय संचार ब्यूरो, अहिल्यानगर यांचे वतीने सूर्यतेज संस्था, कोपरगांव यांचे सहकार्यातून "स्वच्छता ही सेवा" २०२५ अंतर्गत श्रीमान गोकुळचंदजी विद्यालय, कोपरगांव येथे चित्रकला स्पर्धा आणि पारितोषिक वितरण समारंभ क्षेत्रिय प्रचार अधिकारी पी. फणीकुमार यांचे मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला होता.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लिता सातपुते, आय. एम. ए. चे अध्यक्ष डॉ. अमोल अजमेरे, स्वच्छतादूत सुशांत घोडके, मुख्याध्यापक रघुनाथ लकारे, उप मुख्याध्यापक अनिल अमृतकर, पर्यवेक्षक बलभीम उल्हारे , सूर्यतेज संस्थेचे मंगेश भिडे, वर्षा जाधव उपस्थित होते.
"राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि स्वच्छता ही सेवा" या विषयावर विद्यार्थींनी उस्फुर्त चित्र रेखाटून रंगकाम केले. दोन गटातील स्पर्धेचे परिक्षणात गट - अ ( इ.५वी ते इ. ७ वी ) प्रथम क्रमांक - जिकरा अत्तर, द्वितीय क्रमांक - चरण शिंदे, तृतीय क्रमांक - क्रिस्टी शिंदे, उत्तेजनार्थ - तृप्ती शिंदे, अहमद अत्तार तर गट - ब ( इ.८ वी ते इ. १० वी ) प्रथम क्रमांक - प्रणिता अहिरे, द्वितीय क्रमांक - निखिल गोत्रळ, तृतीय क्रमांक - निदा मन्सुरी , उत्तेजनार्थ - गौरी राऊत, समिक्षा सुकटे यांना सन्मान चिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गौरवण्यात आले.
स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक अतुल कोताडे, शितल अजमेरे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन दिगंबर देसाई यांनी केले.






