banner ads

शैक्षणिक संस्थेतही ए-आय तत्रंज्ञानावर अभासक्रम चालू करण्याचा मानस -- आ.आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 शैक्षणिक संस्थेतही ए-आय तत्रंज्ञानावर अभासक्रम चालू करण्याचा मानस -- आ.आशुतोष काळे 

 एज्युकेशन सोसायटीची ५४ वी मा.वार्षिक  सर्वसाधारण सभा
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीची ५४ वी मा.वार्षिक  सर्वसाधारण सभा संस्थेचे चेअरमन मा.आ.अशोकराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली गौतम पब्लिक स्कूलच्या नुकतीच उत्साहात सपंन्न झाली. यावेळी प्रथमतः स्वर्गीय शंकररावजी काळे यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच हस्ते पुजन करण्यात येवून सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली.

सभेच्या अध्यक्षपदाची सूचना अशोक मुरलीधर काळे यांनी मांडली सदर सूचनेस मच्छिंद्र रोहमारे यांनी अनुमोदन दिले.यावेळी दिवंगत झालेले सभासद, मान्यवर, हितचिंतक, कर्मचारी यांच्या श्रद्धांजलीचा ठराव मांडला. त्यानुसार सर्व उपस्थितांनी श्रद्धांजली अर्पण केली. विषय पत्रिकेप्रमाणे सभेच्या कामकाजास सुरूवात होवून विषय पत्रिकेवरील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त आ.आशुतोष काळे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलतांना सांगितले की, संस्थेचा शैक्षणिक  उद्देश लक्षात घेता संलग्न शाखांकडुन नफा न कमवता उत्तमप्रकारे ज्ञानदानाचे कार्य करणे हा आहे. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय कर्मवीर शंकरराव काळे यांचा हा वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न या संस्थेमार्फत अखंडपणे चालु ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे. आपल्या संस्थेच्या संलग्न शखांच्या नवीन इमारतीचे बांधकाम उत्तम प्रकारे चालू आहे.
शासनाच्या बदलत्या शैक्षणिक धोरणाचा विचार करता आपल्या शैक्षणिक संस्थेतही ए-आय तत्रंज्ञानावर अभासक्रम चालू करण्याचा मानस आहे. त्यामुळे जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी शहरी भागातील शिक्षणाचा लाभ कमी खर्चात आपल्या संस्थेमार्फत घेऊ  शकतील.  त्याकरिता  उच्च दर्जाचे होस्टेल सुविधा खास करून मुलींच्या दृष्टीने तयार करण्याचे संस्थेमार्फत प्रयत्न केले जाणार आहे. त्यामाध्यमातून संस्थेचे संस्थापक  स्व. कर्मवीर शंकरराव काळेसाहेब यांचे उद्दिष्ट पूर्ण करता येईल. शाळेचा शैक्षणिक, सांस्कृतिक व खेळाचा दर्जा उत्तम असल्याने एका दिवसात प्रवेश पूर्ण होतात यावरून शाळेचा शैक्षणिक दर्जा किती उच्च प्रतीचा असल्याची प्रचीती येत असल्याचे सांगितले.
संस्थेचे विश्वस्त कारभारी आगवण यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांचे गौतम पब्लिक स्कूलवर अत्यंत जीवापाड प्रेम होते. गौतम पब्लिक स्कूलची शिस्त, गौतम पब्लिक स्कूलच्या माईज  गार्डनमुळे दिसणारा सुंदर परिसर मन भारावून टाकतो. गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख यांनी उपस्थितांचे आभार मानले व साहेबांचा तसेच सर्व संस्था सदस्यांनी जो विश्वास व्यक्त केला आहे तो विश्वास निश्चितपणे  पूर्ण करू अशी ग्वाही दिली. संस्थेचे हेडक्लर्क केशव दळवी यांनी अहवाल वाचन केले

याप्रसंगी व्हा.चेअरमन छबुराव आव्हाड, विश्वस्त कारभारी आगवण, सचिव सौ.चैताली काळे, सिकंदर चॉद  पटेल, भास्करराव आवारे, बाबासाहेब कोते, दिलीप चांदगुडे, सुनील बोरा, मधुकर बडवर, डॉ.चंद्रशेखर आव्हाड, अशोक मुरलीधर काळे, मच्छिंद्र रोहमारे, मच्छिंद्र देशमुख,  ज्ञानदेव  मांजरे , अक्षय काळे,  प्रवीण शिंदे, मधुकर घुमरे, बाळासाहेब बारहाते, अनिल बनकर, राजेंद्र निकोले, विजय आढाव, दिनकरराव काजळे, अँड.नामदेवराव होन, दगुजी होन, विलासराव वाबळे, संस्था इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे तसेच गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य नूर शेख, सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यायाच्या प्राचार्या डॉ.सौ.विजया गुरसळ, गौतम पॉलिटेक्निक इन्स्टिटयुटचे प्राचार्य सुभाष भारती, न्यू इंग्लिश स्कूल देर्डे चांदवड व काकडी चे मुख्याध्यापक प्रकाश देशमुख, बाळासाहेब गुडघे तसेच सभासद उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!