banner ads

तहसीलदार साहेब गरिबांची लुट थांबवा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल -- विजय वहाडणे.

kopargaonsamachar
0


तहसीलदार साहेब गरिबांची लुट थांबवा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल -- विजय वहाडणे



कोपरगाव  ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तहसील कार्यालयासह तालुक्यातील सर्वच शासकीय कार्यालयांना दलालांच्या  विळख्यात सापडले असून गोरगरीब ,सर्व सामान्य जनतेची अक्षरश लुट सुरु आहे, तहसीलदार साहेब गरिबांची ही लुट थांबवा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रशासनाला दिला आहे. 
 कोपरगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये वहाडणे यांनी सर्व शासकीय कार्यालयाच्या तक्रारीचा पाढाच वाचला . ते पुढे म्हणाले की  तहसील कार्यालयामध्ये दलालांचा सुळसुळाट झाला आहे हे तहसीलदारांना माहित नाही काय ?  आमदारांनी या आगोदरही अनेकदा याबाबत खडे बोल सुनावले आहे मात्र त्याचा काही उपयोग झालेला दिसत नाही तालुक्यातील गोरगरीब जनतेची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे, तसेच यात तहसील च्या महिला-पुरुष  असे कोणतेही अधिकारी मागे नाहीत.

शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना नम्र  अवाहन करतो की,, कोपरगांवचा इतिहास बघा,, गरिबांची लूट थांबवा अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल,  असा सज्जड इशारा वहाडणे यांनी दिला दरम्यान याबाबत अधिक बोलताना वहाडणे म्हणाले की,
  काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांना वाटते की आमच्या मागे संघटना आहे परंतु कोणतीही संघटना चूकीच्या गोष्टींचा समर्थन करणार नाही.  आजी माजी आमदार यांनी सांगूनही तहसील कार्यालयातील लुट थांबत नाही हे याचा अर्थ तुम्हाला कोणी विचारायला नाही असे समजू नका,, एखाद्या दिवशी जर  आमची सहनशीलता संपली तर ,, आमचे कार्यकर्ते दांडके घेऊन आले  तर तुम्हाला पळता भूई  थोडी होईल. असा इशारा विजय वहाडणे यांनी दिला आहे.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!