पोहेगांव पोलीस दूरक्षेत्र सुरू करावे -- शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे
पोहेगाव कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला जोडल्याने ग्रामस्थ समाधानी
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
पोहेगांव पूर्वी शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत होते. या पोलीस स्टेशनवर व्हीआयपी यांची अतिरिक्त जबाबदारी व दररोजची वाढती गुन्हेगारी यामुळे पोलीसांवर ताण पडायचा. पोहेगांवला पोलीस दुरुक्षेत्र असताना देखील पोलीस यंत्रणेअभावी कामकाज होत नव्हते. सरकार दरबारी गेल्या अनेक वर्षापासून मागणी होती की पोहेगाव कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडण्यात यावे. यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा केला होता. याची दखल घेत आता पोहेगांव कोपरगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला जोडले आहे.
यामुळे नागरिक समाधानी झाले मात्र कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने पोहेगांव परिसरात रात्रीची गस्त वाढवुन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे व पोहेगांव पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेतले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
यामुळे नागरिक समाधानी झाले मात्र कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनने पोहेगांव परिसरात रात्रीची गस्त वाढवुन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे व पोहेगांव पोलीस दूरक्षेत्र सुरू करण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेतले पाहिजे असे प्रतिपादन शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे मंगळवारी ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांना पोहेगावचा भौगोलिक आराखडा देताना बोलत होते.
पोहेगाव ग्रामपंचायत ,व्यापारी असोसिएशन यांच्यावतीने औताडे यांच्या हस्ते पोलीस निरीक्षक कोळी यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी उपसरपंच अमोल औताडे, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष दादासाहेब औताडे, सचिन शिंदे,संचालक रमेश झांबरे, रियाज शेख, प्रशांत रोहमारे, ग्रामपंचायत सदस्य सचिन औताडे, पोलीस कॉन्स्टेबल अनिश शेख, गोपीने विभागाचे राम खरतोडे अदी उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांनी सांगितले की परिसरातील पोहेगांव खुर्द,पोहेगांव बुद्रुक व जवळके या गावांची जबाबदारी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनवर आली आहे. व्यापारी असोसिएशन व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून येथील पार्श्वभूमी समजून घेतली आहे. नागरिकांच्या समस्या व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस स्टेशन कटिबद्ध आहे. रात्रीची गस्त देखील वाढवण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली .शेवटी अमोल औताडे यांनी आभार मानले.





