गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा कोपरगावात जाहीर निषेध.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगांव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तहसीलदार महेश सावंत यांना गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निवेदनाद्वारे निषेध केला आहे. या निवेदनात नमूद केले की महाराष्ट्र राज्याचे जेष्ठ नेते, माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्या विरोधात नीच व खालच्या दर्जाचे वक्तव्य करणाऱ्या भाजप आमदार गोपीचंद पडळकर याचा कोपरगाव शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करत आहे.
संपूर्ण देशात सुसंस्कृत पणा व सभ्यता यासाठी महाराष्ट्र राज्य ओळखले जाते.
परंतु 2014 पासून या आपल्या सुसंस्कृत राज्यात पडळकर, राणे, राणा, सदावर्ते, कंभौज, वाघ अश्या अनेक लोकांना राजश्रय व पाठबळ देऊन विरोधी पक्षाच्या नेत्यांवर खालच्या पातळीवर टीका करवली जाते. याला महाराष्ट्र राज्याचे सुसंकृत म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायबंद घालावा यापुढे विरोधी पक्षाच्या नेत्यां बद्दल खालच्या पातळीवर व भावना दुखावणारी वक्तव्य झाली तर तीव्र आंदोलन केले जाईल व निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यास्थेची जबाबदारी संबंधित वादग्रस्त वक्तव्य करणारी व्यक्ती व शासनाची राहील याची नोंद घ्यावी असा इशारा पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी ॲड.संदीप वर्पे म्हणाले की कोपरगाव तालुक्यातील जिरायती भागाला वरदान ठरलेल्या निळवंडे साठी जलसंपदा मंत्री असताना भरीव तरतूद जयंत पाटलांनी केली त्यामुळे निळवंडेची कामे पूर्णत्वास, तर ब्रिटशकालीन गोदावरी डाव्या व उजव्या कालव्यांच्या अस्तरीकरणासाठी निधी जयंत पाटलांनी दिला.जयंत पाटील राज्य पातळीवर योगदान देणारे नेते.
गोपीचंद पडळकरच योगदान काय ? -गोपीचंद पडळकर सारख्या व्यक्ती मधे जर देवेंद्र फडणवीसांना भवितव्य दिसत असेल तर देवेंद्रजींच्या सुसंस्कृत पणा बद्दलच शंका येत असल्याचे- ऍड. संदीप वर्पे म्हणाले.
याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड.संदीप वर्पे,अॅड. दिलीप लासुरे,सुरेश आसने ,किशोर वाकचौरे,अॅड. रमेश गव्हाणे
नंद किशोर जाधव,गौतम बनसोडे
सुनिल वर्पे,दिनेश पवार,निखिल थोरात,स्वप्नील पवार,रिंकू मगर ,माजिद पठाण,शुभम शिंदे,विजय खोमणे
सॅम जावळे,ओंकार वढणे,अॅड.ऋषिकेश पोकळे, गणेश शिंदे, ऋतुराज काळे आदीसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त उपस्थित होते.







