गुन्हेगारांना पाठीशी घालून संस्कृती बिघडणारा आ.का. कोण ? विवेक कोल्हे
आरोपी स्विय्य सहाय्यक आमदार काळे यांनी पोलिसांकडे हजर करावा आवाहन
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव मतदारसंघात सुरू असलेला गुन्हेगारीचा सुळसुळाट हा कोणत्या आ.का. च्या आशीर्वादाने सुरू आहे ? नुकतेच आमदार काळे यांच्या स्वीय सहाय्यकाने दगडफेक केल्यामुळे आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही गोळीबार प्रकरणात आणि अवैध धंद्यात त्यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले. एखाद्या गुन्हेगारी व्यक्त प्रदेशासारखे कोपरगावचे चित्र निर्माण करणारा प्रकार नवरात्र सारखा उत्सवात घडतो आहे हे दुर्दैव आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आमदार रात्री आणि पीएला वाचवण्यासाठी ही प्रयत्न करतात मात्र स्वर्गीय दर्शना पवार या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणात आपण सत्कार शब्द काढला नाही. गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या तुमच्या स्वीय सहाय्यकाला पोलिसांच्या स्वाधीन करा असे खुले आवाहन सहकार महर्षी कोल्हे कारखाना वार्षिक सभेप्रसंगी विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांना केले आहे.
उपकाराची टिप्पणी करणाऱ्या आ.काळे यांना कोपरगाव मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत विधानसभेला सर्वात कमी मता पैकी एक असणारे आमदारातून सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पहिल्या पाच मध्ये कुणामुळे जाता आले याचा त्यांना विसर पडला असेल. वेळ सरल्यानंतर त्यांची भाषा बदलली.
चाळीस वर्षाच्या वरचे अर्धे मतदार या मतदारसंघात आहे ज्यांना गेल्या 20 वर्षात मतदानाचा अधिकार मिळाला आहे.त्यातले 16 वर्षे तुम्ही सत्तेत आहात त्यांना आपण काय न्याय दिला हे लोकांना अनुभव येत आहेत.निकृष्ट रस्ते,अवैध धंदे,गुन्हेगारी,भ्रष्टाचार,टक् केवारी यामुळे नागरिक जेरीस आले आहेत.जनतेच्या उपकाराची परतफेड तुम्ही या प्रकाराचा कारभार करून करत असाल तर परिणाम जनता दाखवून देईल.
आमच्या सत्तेच्या काळात जनतेसाठी लढणे मैदानात उतरून आंदोलन करणे, धरणे वीज पाणी रस्ते भौतिक सुविधा सामाजिक शैक्षणिक प्रश्न यासाठी भरीव काम झाले याची जनता साक्षीदार आहे. स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या काळात राज्याचे आर्थिक बजेट अंदाजे 25 हजार कोटीपर्यंत होते आणि आज सात लाख कोटींपर्यंत गेले आहे. पूर्वी आमदारांना मिळणारा आमदार निधी कमी होता आता तो पाच कोटीपर्यंत वार्षिक गेला आहे.
या वेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,कोल्हे कारखाना सर्व संचालक,विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव मतदारसंघात सुरू असलेला गुन्हेगारीचा सुळसुळाट हा कोणत्या आ.का. च्या आशीर्वादाने सुरू आहे ? नुकतेच आमदार काळे यांच्या स्वीय सहाय्यकाने दगडफेक केल्यामुळे आणि पोलिसांवर हल्ला केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. यापूर्वीही गोळीबार प्रकरणात आणि अवैध धंद्यात त्यांचे निकटवर्तीय असल्याचे समोर आले. एखाद्या गुन्हेगारी व्यक्त प्रदेशासारखे कोपरगावचे चित्र निर्माण करणारा प्रकार नवरात्र सारखा उत्सवात घडतो आहे हे दुर्दैव आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालण्यासाठी आमदार रात्री आणि पीएला वाचवण्यासाठी ही प्रयत्न करतात मात्र स्वर्गीय दर्शना पवार या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या खून प्रकरणात आपण सत्कार शब्द काढला नाही. गंभीर गुन्ह्यात आरोपी असलेल्या तुमच्या स्वीय सहाय्यकाला पोलिसांच्या स्वाधीन करा असे खुले आवाहन सहकार महर्षी कोल्हे कारखाना वार्षिक सभेप्रसंगी विवेक कोल्हे यांनी आमदार काळे यांना केले आहे.
उपकाराची टिप्पणी करणाऱ्या आ.काळे यांना कोपरगाव मतदारसंघात महायुतीचा धर्म पाळत विधानसभेला सर्वात कमी मता पैकी एक असणारे आमदारातून सर्वाधिक मते मिळवणाऱ्या पहिल्या पाच मध्ये कुणामुळे जाता आले याचा त्यांना विसर पडला असेल. वेळ सरल्यानंतर त्यांची भाषा बदलली.
चाळीस वर्षाच्या वरचे अर्धे मतदार या मतदारसंघात आहे ज्यांना गेल्या 20 वर्षात मतदानाचा अधिकार मिळाला आहे.त्यातले 16 वर्षे तुम्ही सत्तेत आहात त्यांना आपण काय न्याय दिला हे लोकांना अनुभव येत आहेत.निकृष्ट रस्ते,अवैध धंदे,गुन्हेगारी,भ्रष्टाचार,टक्