कोपरगाव बस स्टँडची पोलिस चौकी असुन अडचण अन् नसून खोळंबा"
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
दोन दिवसांपूर्वी बस स्टँड वर दोन गटात तुफान रहाडा झाला.बस स्टँड वर या पूर्वी अनेकदा महिला मुलींची छेड काढली.पर्स, सोन्याचे दागिने चोरी गेले.
वारंवार घटना घडतात म्हणून पोलीस चौकीची मागणी झाली.सुदैवाने तीन चार महिन्यापूर्वी पोलीस चौकी बसवली.मात्र पोलीस चौकी सुरू करायला पोलीस प्रशासन एखादी अनुचित घटना घडण्याची वाट पहात आहे की काय? असा सवाल
आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की, कोपरगाव बस स्टँड हे गुन्हेगार टवाळ खोरांचे माहेर घर झाले आहे. या ठिकाणी अनेकदा ग्रामीण भागातून उच्च शिक्षणासाठी मुली येत असतात महाविद्यालया तील शिक्षण घेणाऱ्या मुलींना अनेकदा टवाळ खोर मुले त्रास देतात त्याच प्रमाने मोबाईल फोन, पैशाच्या पाकिटावर गर्दीचा फायदा घेऊन डल्ला मारला जातो. अनेक महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र सोन्याच्या वस्तु चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे बस स्टँड परिसरात पोलीस चौकी उभारण्यात येऊन कायम स्वरुपी पोलिसांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी केली.
मागील तीन चार महिन्यापूर्वी बस स्टँड परिसरात असलेली अतिक्रमणे नगर पालिका प्रशासनाने हटवली व या जागेवर पोलीस चौकी उभी केली मात्र अद्याप या पोलीस चौकी सूरू करण्यासाठीं पोलीस प्रशासनाला वेळ मिळत नाही नुकताच बस स्टँड परिसरात दोन तीन दिवसांपूर्वी दोन गटात तुफान रहाडा झाला.या परिसरातील पोलीस सूरू कऱण्यात आली असती तर टवाळखोरांचा तात्काळ बंदोबस्त करण्यात आला असता मात्र ही पोलीस चौकी असुन अडचण अन् नसून खोळंबा अशी झाली आहे. पोलीस प्रशासन मोठा अनुचीत प्रकार घडल्यावर ही पोलीस चौकी सुरू करणार आहे का असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने त्वरित लक्ष घालून बस स्टँड परिसरात उभारलेली पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी ॲड नितीन पोळ यांनी या प्रसिद्धी पत्रकात केली आहे





