स्वदेशी आयुर्वेदाचा समजून सदुपयोग करा --- राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड
कोपरगांवात आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवसाचे आयोजन.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
भारतीय ऋषी-मुनींनी विकसित केलेले आयुर्वेद शास्र मनुष्याचा निरोगी आयुर्मानासाठी महत्त्वाचे असून प्रत्येकाने स्वदेशी आयुर्वेदाचा समजून सदुपयोग करावा. असे आवाहन राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांनी एका व्याख्यानात सांगितले.
कोपरगांव येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस. एस. जी. एम. महाविद्यालयात सूर्यतेज संस्था, महाविद्यालय आरोग्य समिती, वसतिगृह समिती यांचे वतीने १० व्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद दिवस निमित्ताने राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ.रामदास आव्हाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे होते. तर आयुर्वेदाचार्य डॉ.रिध्दी आव्हाड, सूर्यतेज संस्थापक व स्वच्छतादूत सुशांत घोडके, प्रा. सुभाष सैदनशिव, प्रशिक्षणार्थी डॉ. पायल देशमुख, डाॅ.अश्विनी वर्मा, डॉ.स्नेहल कोकाटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
सूर्यतेज संस्थापक सुशांत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला, सांस्कृतिक क्षेत्रात निरंतर क्षेत्रात कार्य सुरु आहे. यंदाचे सूर्यतेज संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष असून यानिमित्ताने विविध उपक्रम हाती घेतले आहे. यात कोपरगांव येथील शाळांमध्ये राष्ट्रीय आयुर्वेद गुरु डॉ. रामदास आव्हाड यांचे "गिरवू आयुर्वेदाचे धडे" या विषयावर विशेष व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधत गुंफले .
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आयुर्वेदाला विशेष महत्त्व देवून आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. तसेच धन्वंतरी पूजन दिवशी साजरा होणारा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस हा २३ सप्टेंबर रोजी समप्रमाणात दिवस- रात्र असल्याने निवडला आहे. आयुर्वेदाला राजाश्रय मिळाला आहे.
या प्रसंगी राष्ट्रीय आयुर्वेद गुरु रामदास आव्हाड पुढे म्हणाले, आयुर्वेद हे ५००० वर्षापूर्वी पासून शास्र आहे. आयुर्वेद हे मुळाशी जावून उपचार करणारे शास्त्र आहे. दिनचर्येत बदल तरी बरेच आजार कमी होतात. ऋतू चर्येत आहार महत्वाचा आहे. ऋषी-मुनींनी आपल्याला हे वळण लावले आहे. आयुर्वेदाचे महत्त्व जगाला कळले असल्याचे सांगितले.
या प्रसंगी आयुर्वेदाचार्य डॉ. रिध्दी आव्हाड म्हणाल्या, मनुष्याला प्रकृती परिक्षण महत्वाचे असून आजार होवू नये म्हणून जीवनशैली शिकवणारे उत्तम शास्र असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी भारतीय परंपरेतील आयुर्वेदाचे महत्त्व समजून घेतले पाहिजे. पुर्व आयुर्वेदाचे महत्त्व जाणून घरातील महिलेकडे आजीबाईचा बटवा असायचा. वेळ प्रसंगी आवश्यक आयुर्वेद वनस्पती असायची. बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपले आरोग्य धोक्यात टाकत असल्याचे सांगितले. आयुर्वेद वनस्पतींची माहिती देणारे प्रदर्शन भरविण्याचा संकल्प केला.
प्रारंभी पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक आरोग्य समितीच्या डॉ.प्रतिभा रांधवणे यांनी केले. तर सुत्रसंचलन डॉ.सिमा दाभाडे यांनी तर आभार प्रा. सुकेशिनी दुशिंग यांनी केले.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्रा. उज्वला भोर, डॉ. भागवत देवकाते, डॉ.बंडेराव त-हाळ, प्रा. मोहित गवारे, प्रा. विद्या देवकर, प्रा. प्रतिक्षा रोहम, यांचे स शिक्षक व सूर्यतेज सदस्यांनी परिश्रम घेतले.







