कोपरगाव तालुक्यात वृक्षारोपण करून अभियंता दिवस साजरा 
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
राष्ट्रीय अभियंता दिवस व भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांच्या जयंतीचे औचित्य साधून तालुक्यातील सवंत्सर येथील नाना नानी पार्क येथे .मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी , यांच्या संकल्पनेतील वृक्ष लागवड उपक्रम मा.जि.प.सदस्य राजेश परजणे यांच्या हस्ते करून अभियंता संघटना शाखा कोपरगाव यांच्या वतीने अभियंता दिवस साजरा करण्यात आला.
अहिल्या नगर जिल्हा परिषद अभियंता संघटना शाखा कोपरगाव च्या वतीने १०० नारळाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी कार्यक्रमास जि.प.अभियंता संघटना अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष इंजि.राजु दिघे,
उपसरपंच विवेक परजणे,बाल विकास प्रकल्प अधिकारी पंडित वाघिरे, तालुका आरोग्य अधिकारी विकास घोलप,उपअभियंता रवींद्र पिसे,पशुधन अधिकारी श्रीमती श्रद्धा काटे,कृषी अधिकारी सचिन कोष्टी , लेखा अधिकारी गणेश सोनवणे,कृषी विस्तार अधिकारी बाळासाहेब साबळे, विस्तार अधिकारी पंचायत बबन वाघमोडे ,कक्ष अधिकारी ऋषीकेश बोरुडे,इंजि.सी.डी. लाटे ,इंजि.अश्विन वाघ , इंजि. निकम , इंजि.राजु रोहम, इंजि. हेमंत परंडकर, काली प्रसाद कुऱ्हे, रामदास मिसाळ, गणेश चौधरी, आर.एच.बाविस्कर, मेहेरखांब अधिकारी कर्मचारी मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, यासाठी कृषी विभागा च्या वतीने पंडित वाघीरे व बाळासाहेब साबळे यांनी बांधकाम विभागास विशेष सहकार्य केले






