साखर कामगार पतपेढीच्या उपक्रमातुन मुलांच्या गुणवत्तेला वाव-हरिभाऊ मोरे
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे व युवा अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांच्या बौध्दीक वाढीसाठी सातत्यांने पाठबळ दिले. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीने दहावी बारावी सह पदव्युत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा वार्षीक सर्वसाधारण सभेत सत्कार करून त्यांच्या गुणवत्तेला वाव दिल्याचे प्रतिपादन अभियंते हरिभाऊ अशोक मोरे यांनी केले.
तालुक्यातील शिंगणापुर येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कामगार पतपेढीची ६१ वी वार्षीक सर्वसाधारण सभा नुकतीच संपन्न झाली त्यात कार्यकारी संचालक सुहास यादव, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, अध्यक्ष उत्तमराव शेळके,सचिव तुळशीराम कानवडे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी चैतन्य हरिभाऊ मोरे, यांचा नुकताच सत्कार करण्यांत आला त्याप्रसंगी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
सत्कारास उत्तर देतांना विद्यार्थी चैतन्य मोरे म्हणाले की, इयत्ता बारावी परिक्षेत आपल्याला ८० टक्के गुण मिळाले होते. आता संगणकीय अभियंता उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेवुन देशाच्या नांवलौकीकात भर घालण्याचा आपला मनोदय आहे. संजीवनी साखर कामगार पतपेढीने सभासद मुलांच्या गुणवत्तेचा सन्मान केला त्याबददल कौतुक आहे. शेवटी व्यवस्थापक राजेंद्र सोनवणे यांनी आभार मानले.






