banner ads

“नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास कविताच वाचवणार ”- प्रा. ऐश्वर्य पाटेकर

kopargaonsamachar
0

  “नष्ट होत जाणाऱ्या शेवटच्या माणसास कविताच वाचवणार ”- प्रा. ऐश्वर्य पाटेकर

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )

- “साहित्य काय असते, माणसाला माणूस बनवण्याचा रियालिटी शो आज उपलब्ध नाही, माणूस बनवण्याचे कार्य महाविद्यालय करते आहे त्यामुळे अभ्यासक्रमाबरोबरच कला ही महत्त्वाची आहे. ज्याने ‘रागावर आवरला त्याने वाघ आवरला'  या म्हणीचा अर्थ सांगताना पुस्तके हे राग आवरण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करत असून आजच्या काळात पालकांनी विद्यार्थ्यांना दुःखाची जाणीव होऊ दिली नाही म्हणून आज विद्यार्थ्यांना कोणत्याही गोष्टी कमतरता भासत नाही याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी.” असे प्रतिपादन साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी  केले.

     ते एस.एस.जी.एम. महाविद्यालयातील वाड्मय मंडळ व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाड्मय उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी भूषविले.
     ऐश्वर्य पाटेकर यांनी आपल्या मनोगतात,“ संवेदनशीलतेच्या सुई दोऱ्यातून टाचतो अनुभव, हळूहळू नष्ट केले जाणारे जिवंत सोज्वळ गाव, वर्तमानाला वाळवी लागलीय, सगुण आणि सद्गुणी माणसाचे जीवन संपत चाललेय, यासारखे कवितांचे वाचन करून साहित्य काय असते ही संकल्पना विस्तृत स्वरूपात स्पष्ट केली.”       
    अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “भाषा ही आपल्या जीवनात विविधांगाने मदत करते. भाषिक ज्ञान आजच्या काळात आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात काम करताना  अनेक भाषा येणे आवश्यक आहे. वाड्मय मंडळ हे महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांचे आयुष्य घडविणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. त्यामुळे वाड्मय मंडळाअंतर्गत  येणाऱ्या विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा. ऐकलेले ज्ञान हे वाचण्यापेक्षा मोठे असते. त्यामुळे लेखन, साहित्याच्या क्षेत्रात बहुभाषिक असणे गरजेचे आहे. असे स्पष्ट केले.
      सदर कार्यक्रमाचे  प्रास्ताविक, पाहुण्यांचा परिचय  प्रा. उज्ज्वला भोर यांनी करून दिला. प्रस्तुत कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे विभागीय निरीक्षक प्रा. तोरणे, डॉ. बंडेराव तऱ्हाळ, प्रा.डॉ. संतोष पवार,कमिटीतील सर्व सदस्य,कला शाखेतील सर्व प्राध्यापक, कला  विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.  सदर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन डॉ. भागवत देवकाते यांनी केले. तर आभार  डॉ.माधव यशवंत यांनी मानले.
      

                                                                          

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!