banner ads

येसगाव विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा संपन्न

kopargaonsamachar
0

 येसगाव विद्यालयात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा  संपन्न


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, थोर समाजसुधारक व शिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, येसगाव येथे जयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, युवानेते . विवेक  कोल्हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
सभागृहात प्रवेश करताना विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक . रंगनाथ ठाकरे यांनी स्वागतपर भाषणातून विद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला व पाहुण्यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापक . लक्ष्मणराव कोल्हे  यांनी डॉ. भाऊराव पाटील यांचे त्यागमय व समाजोद्धारक कार्य, कमवा व शिका योजना आणि रयत शिक्षण संस्थेचा महान वारसा याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी माहिती दिली.विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून कु. आरोही वाघ व ग्रामस्थ प्रतिनिधी म्हणून स्थानिक सल्लागार समिती सदस्य . बापूसाहेब सुराळकर यांनीही मनोगतातून कर्मवीरांचे विचार मांडले.

जयंती निमित्त विद्यालयात विविध सांस्कृतिक, शैक्षणिक व स्पर्धात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यातील यशस्वी विद्यार्थ्यांसह एस.एस.सी. व एच.एस.सी. परीक्षेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.याकामी विद्यार्थ्यांचा विश्वास अधिक दृढ करण्यासाठी शिक्षणप्रेमी नागरिकांच्या वतीने पारितोषिक देण्यात आले.
अध्यक्षीय मनोगतात युवानेते विवेक कोल्हे यांनी रयत शिक्षण संस्थेच्या कार्याचा गौरव केला.येसगाव विद्यालयाच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करून संस्थेला व विद्यालयाला येत्या काळात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
या सोहळ्यास सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी सोसायटी येसगावचे चेअरमन ,सचिन कोल्हे, बाळासाहेब निकोले, उपसरपंच .संदीप गायकवाड, अतुल सुराळकर, इंजि..योगेश कुलकर्णी,.किरण गायकवाड,डॉ. मनोज आहेर, गोरख आहेर,.सचिन गायकवाड,ॲड. उत्तमराव पाईक,.संतोष सुराळकर,. कुशाराम सुराळकर,  शंकरराव पाईक,  दत्तात्रय राहाणे, . घनश्याम चांदर,  सतिश शिंदे,. साईनाथ चाबुकस्वार, अल्लाउद्दीन शेख,.दीपक गोसावी,  संतोष बोळीज, तानाजी गायकवाड,सौ. स्वाती सहाणे, .चंद्रकांत निर्मल, जगन अभंगे, अमित सुराळकर,  नितिन आहेर, यश पानगव्हाणे, संकेत जपे,.सचिन भालके आदी मान्यवर तसेच शिक्षणप्रेमी नागरिक, ग्रामस्थ, सेवक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख  रामदास गायकवाड यांनी केले.
अध्यक्ष निवड सूचना  प्रवीण बोराडे, अनुमोदन  गंगाधर घोरपडे  यांनी केले, तर  उपस्थितांचे आभार  उपशिक्षक  योगेश कदम यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!