banner ads

कोपरगांव येथील प्रगत शेतकरी माधवराव मांढरे यांचे निधन

kopargaonsamachar
0

 कोपरगांव येथील प्रगत शेतकरी माधवराव मांढरे यांचे निधन 



कोपरगांव (वार्ताहर) 

कोपरगाव येथील प्रगतशील शेतकरी व मोदावरी खोरे सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक माधवराव उर्फ संपतराव बारकू पा. मांढरे यांचे रविवारी दीर्घ आजाराने निधन झाले. मृत्युसमयी ते ८५ वर्षाचे होते. कोपरगांव येथील अमरधामध्ये त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

कै. संपतराव मांढरे यानी गोदावरी दूध संघाचे संचालकपद भुषविलेले होते. संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील आण्णातसेच संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक व माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे ते विश्वासू सहकारी होते. कै. मांढरे यांचा शेतीबरोबरच ट्रकचा व्यवसाय होता.  प्रगतशील शेतकरी व व्यावसायिक म्हणून त्यांचा कोपरगाव तालुक्यात सर्वत्र नावलौकीक होता.  त्यांच्या पश्चात पत्नी, डॉ सुनिल व ज्ञानेश्वर ही दोन मुले व सुना नातवंडे ,  पणतू असा परिवार आहे. गोदावरी दूध संघाचे चेअरमन राजेश परजणे पाटील यांनी कै मांढरे यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबांचे सांत्वन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!