banner ads

ऑटोनॉमसमुळे संजीवनीचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा अधोरेखित

kopargaonsamachar
0

 संजीवनी पॉलीटेक्निक ही महाराष्ट्रातील  विनाअनुदानित संस्थांमधिल पहिली ‘आटोनॉमस’ दर्जा प्राप्त संस्था   -  नितिनदादा कोल्हे


ऑटोनॉमसमुळे संजीवनीचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा अधोरेखित
कोपरगांव: ( लक्ष्मण वावरे )
संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निकला शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासुन महाराष्ट्र राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण  मंत्रालयाकडून ‘ऑटोनॉमस (स्वायत्तता)’ संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे. यामुळे संजीवनी पॉलीटेक्निक हे महाराष्ट्रातील ३५० पेक्षा अधिक  विनाअनुदानित संस्थांपैकी ऑटोनॉमस दर्जा प्राप्त करणारे पहिले पॉलीटेक्निक ठरले आहे. या दर्जामुळे संजीवनी पॉलीटेक्निकचा दर्जा व गुणवत्ता पुन्हा एकदा अधोरेखित झाले. ऑटोनॉमस दर्जा प्राप्त व सलग बारा वर्षे  एनबीए मानांकन मिळविणारेही संजीवनी पॉलीटेक्निक एकमेव आहे. या सर्व कीर्तिमानांनी संजीवनी संस्था राज्यातील एक अग्रेसर संस्था म्हणुन नावलौकिक प्राप्त झाली आहे, अशी  माहिती संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे

 संजीवनीच्या या अभुतपूर्व यशाबद्धल  संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे व  अमित कोल्हे यांनी प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख, डीन्स, सर्व शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी यांचा एका शानदार  कार्यक्रमात अभिनंदन करून कौतुकाची थाप दिली. या कार्यक्रमात बोलताना अमित कोल्हे म्हणाले की संस्थेचे संस्थापक स्व. शंकरराव  कोल्हे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी स्वावलंबी व्हावे, असे स्वप्न सुमारे ४२ वर्षांपूर्वी  पाहीले आणि पॉलीटेक्निकची प्रथमतः स्थापना केली. उद्योगाभिमुख अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले पाहीजे, या संकल्पनेवर त्यांचा विशेष  भर असायचा. त्यांच्या मार्गदर्षक तत्वांनुसार अनेक उपक्रम राबविण्यात आले. त्याची फलनिष्पत्ती  ग्रामीण विद्यार्थ्यांना नमांकित कंपन्यांमध्ये उच्चांकी नोकऱ्या  मिळण्यास झाली. यापुढे तर अत्याधुनिक तंत्रज्ञानाधिष्टित  व उद्योगाभिमुख, अधिक कौशल्ये असणारा अभ्यासक्रमाचा समावेश  करण्याची स्वायत्तता प्राप्त झाली आहे.
      मुख्यमंत्री  देवेंद्र फडणविस आणि उच्च व तंत्रशिक्षण  मंत्री  चंद्राकांत पाटील यांनी ग्रामीण भागातील संस्थेला ऑटोनॉमस दर्जा देवुन एक नव्या दिशेने  जाण्याची संधी दिली, याबध्दल या कार्यक्रमात  अमित कोल्हे यांनी त्यांचे आभार मानले.

       नितिनदादा कोल्हे यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की ऑटोनॉमस संदर्भात आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद  (एआसीटीई), नवी दिल्ली, महाराष्ट्र  राज्य तंत्रशिक्षणालय व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण  मंडळ यांचे मोलाचे मार्गदर्शन  लाभले. अंतिमतः महाराष्ट्र  राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षणालयाने ‘आटोनॉमस’ दर्जाची मोहर उमटविली.
ऑटोनॉमस दर्जा प्राप्त झाल्यामुळे एखादा विद्यार्थी एखाद्याा सत्रात एक किंवा अधिक विषयांमध्ये नापास झाला तर त्यांची लागलीच १५ दिवसात पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वाया जाणारे वर्ष  टळणार आहे. जसजसे तंत्रज्ञान बदलेल तसे अभ्यासक्रमात बदल करण्याची परवानगी आता संस्थेला आहे, असे पत्रकात शेवटी म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!