तरुणांच्या धर्मकार्यातील सहभागाने कार्यक्रमाची शोभा वाढते. -- महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज
नगदवाडी सप्ताहाचे ध्वजारोहण उत्साहात
कोपरगाव (लक्ष्मण वावरे )
नगदवाडी येथील अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला ३९ वर्ष पूर्ण होत आहे. ग्रामस्थांच्या मदतीने धर्मकार्य वाढत आहे. धर्म कार्याला दान दिल्याने दान देणाऱ्यांचे कल्याण होते. ज्येष्ठांचे मार्गदर्शन व तरुणांचा धर्मकार्य सहभाग कार्यक्रमाची शोभा वाढवतो असे प्रतिपादन राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांनी केले.
ते कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील नागदवाडी अखंड हरिनाम सप्ताहाचे ध्वजारोहण करताना बोलत होते. यावेळी कानिफनाथ देवस्थानचे व्यवस्थापक श्री पोटेबाबा,यावेळी संतोष महाराज वाघ, कृष्णा महाराज पोहेकर व ग्रामस्थ उपस्थित होते.
पुरोहित विक्रम कुलकर्णी गुरु यांच्या हस्ते पूजा विधि संपन्न झाला.काल शनिवारी सुरू झालेल्या सप्ताहकाळात दररोज पहाटे चार ते सहा काकडा भजन, सकाळी सात ते दहा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा, सायंकाळी पाच ते सात हरिपाठ व रात्री नऊ ते 11 कीर्तन सेवा संपन्न होणार आहे.किर्तन सेवेमध्ये कैलास महाराज वाघ, योगेश्वर महाराज जाधव, तुकाराम महाराज जेऊरकर, विलास महाराज गेजगे, नारायण महाराज शास्त्री, गंगाराम महाराज राऊत या कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहे. काल्याचे किर्तन शनिवार दिनांक 16 ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते बारा वाजता पंढरपूर येथील रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांचे कीर्तन होणार आहे. कीर्तनासाठी सातसंगत मृदुंगाचार्य विनायक महाराज मुलगिर , निवृत्ती महाराज पाटील, बाळासाहेब महाराज जाधव, गायनाचार्य कृष्णा महाराज पोहेकर, संतोष महाराज वाघ हे साथ संगत करणार आहे.तरी परिसरातील भाविकांनी कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन नगदवाडी सप्ताह कमिटी व ग्रामस्थ मंडळांनी केली आहे.
चौकट..
महंत राघवेश्वरानंदगिरी महाराज यांना विश्व सनातन धर्मगुरू ही पदवी मिळाल्याबद्दल सोनेवाडी नागदवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राघवेश्वरानंदगिरीजी महाराज म्हणाले की श्रीक्षेत्र कुंभारी येथे गंगागिरीजी महाराजांचा अखंड हरिनाम सप्ताह 120 वर्षांपूर्वी संपन्न झाला होता. तोच सप्ताह महंत रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली 2025 साठी कुंभारी येथे घेण्याचा मानस आहे. मंहंत रामगिरीजी महाराज यांनी याबाबत संकेत दिले आहेत. सप्ताहाचे नारळ घेण्यासाठी आपल्या सर्वांना बरोबर घेऊन जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.





