banner ads

माजी विद्यार्थ्यांच्या दार्तृत्वातुन शैक्षणिक कार्यासाठी शिष्यवृत्ती-मोरे

kopargaonsamachar
0

 माजी विद्यार्थ्यांच्या दार्तृत्वातुन शैक्षणिक कार्यासाठी शिष्यवृत्ती

कोपरगांव / लक्ष्मण वावरे 
             माजी विद्यार्थ्यांच्या दार्तृत्वातुन शैक्षणिक कार्यासाठी मिळालेली शिष्यवृत्ती मोठी असुन कर्मवीर भाउराव पाटील यांचे ब्रीदवाक्य शरद शिंदे यांनी खरे करून दाखविले असे प्रतिपादन जनता इंग्लिश स्कुलचे मुख्याध्यापक आर. एस मोरे यांनी केले.
            तालुक्यातील संवत्सर येथील रयत शिक्षण संस्थेचे जनता इंग्लिश स्कुलचे माजी विद्यार्थी शरद शिंदे यांनी सालाबादप्रमाणे याही वर्षी उल्हास ट्रस्ट अंतर्गत नववी, दहावीतील हुशार होतकरू गरीब अकरा विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार प्रमाणे अकरा हजार रूपये शिष्यवृत्ती तर चारशे मुलांना दैनंदिन डाय-यांचे वाटप भारतीय स्वातंत्रदिनाचे औचित्य साधत शुक्रवारी वाटप केले त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पांडुरंगशास्त्री शिंदे होते.

             प्रारंभी जनता इंग्लिश स्कुल संवत्सर स्थानिक सल्लागार समितीचे मधुकर साबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पर्यवेक्षक व्ही. के. जेजुरकर यांनी प्रास्तविक केले. सरपंच सुलोचना ढेपले यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अध्यक्षपदावरून बोलतांना पांडुरंगशास्त्री शिंदे म्हणाले की, ग्रामिण भागातील हुशार मुला मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यांच्या हेतुने उल्हास ट्रस्टचे शरद शिंदे यांनी सुरू केलेला उपकम नाविन्यपुर्ण आहे, समाजाचं आपण देणं लागत असतो त्या भावनेतुन या उपक्रमाला विशेष महत्व आहे.
             याप्रसंगी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक बापूसाहेब बारहाते, फकिरराव बोरनारे, अशोकराव लोहकणे, ज्ञानेश्वर शिंदे, अर्जुन वरगुडे, निलेश कर्पे, भरत बोरनारे, लक्ष्मण साबळे, पोलिस पाटील श्रीमती आचारीताई, भाउसाहेब परजणे, दिलीपराव ढेपले, बाळासाहेब भोसले, बाळासाहेब गायकवाड आदिंच्या हस्ते मुलांना शिष्यवृत्तीसह डाय-यांचे वाटप करण्यांत आले. जनता इंग्लिश स्कूल संवत्सरचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार लक्ष्मण साबळे यांनी मानले.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!