मृत्यूनंतरही त्यांनी पेटवली जीवनाची ज्योत.
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव ग्रामसभा सहस्त्र अर्जुन क्षत्रिय समाजाच्या महिला अध्यक्ष मालाताई दीपकसा धोंगडी (पहिलवान) यांचा नुकताच उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला त्या 55 वर्षाच्या होत्या मृत्युपश्चात त्यांच्या इच्छेनुसार सामाजिक बांधिलकी जपत त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचं मरणोत्तर नेत्रदान केले मालाताई ह्या प्रसिद्ध उद्योजिका देखील होत्या त्यांचे वडील किशोर पैलवान यांच्या मृत्यूनंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळत किशोर डिस्ट्रीब्युटर्स ,किशोर रेस्टॉरंट हा व्यवसाय यशस्वी सांभाळला मृत्युपच्यात सामाजिक कार्यकर्ते डॉ अशोक गावित्री तसेच तास ट्रान्सप्लांट कॉर्डिनेटर श्री साईनाथ नेत्रपेढी विभाग प्रमुख यांच्या सहकार्याने त्यांचे नेत्रदान शिर्डी येथे करण्यात आले.
त्यांच्या या महान कार्यामुळे निश्चितच दोन अंध व्यक्तींच्या आयुष्यात प्रकाशाची नवीन पहाट होणार असून त्यांचे हे कार्य इतरांना निश्चितच प्रेरणादायी असून आज पाच लाखांपेक्षा अधिक अंध व्यक्ती असून ते नेत्र बुबुळ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे त्यामुळे प्रत्येकाने मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प करून नेत्रदान करावे अशा भावना डॉक्टर अशोक गावित्रे यांनी याप्रसंगी व्यक्त केल्या यावेळी निखिल दीपक घोंगडी, गीतांजली अनिल कंकरेच ,अविनाश कंकरेच ,डॉ उमेश कंकरेज,प्रियंका कंकरेज नंदिनी कंकरेज सहाना कंकण महेक कंकरेज आदी कुटुंब याप्रसंगी उपस्थित होते






