banner ads

सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी पीक व्यवस्थापन महत्त्वपूर्ण

kopargaonsamachar
0

 सोयाबीनच्या उत्पादन वाढीसाठी पीक व्यवस्थापन महत्त्वपूर्ण --: पोपटराव खंडागळे



 वारी येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यशाळा 

कोपरगाव  ( लक्ष्मण वावरे )
शेती व्यवसायामध्ये शाश्वत उत्पन्न मिळवण्यासाठी पीक व्यवस्थापन हे अत्यंत महत्त्वाचे आहे. पिकाच्या लागवडीपासून तर काढणीपर्यंतच्या कालावधीत योग्य त्या फवारण्या, अंतर मशागती, खत व्यवस्थापन हे  नियोजनबद्ध केले, तर निश्चितच कोणत्याही पिकाच्या उत्पादनात वाढ होते. विशेष करून सोयाबीन सारख्या पिकात 110 दिवसाच्या कालावधीमध्ये चार टप्प्यांमध्ये नियोजन केल्यास निश्चितच फायदा होतो. येत्या काळात शेतकऱ्यांनी पिकांचे व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, ज्यातून उत्पादन वाढेल आणि शेतकरी समृद्ध होईल असे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या जळगाव येथील पानवेल संशोधन प्रकल्पाचे सह प्राध्यापक तथा पानवेल संशोधक डॉ. पोपटराव खंडागळे यांनी केले.

    कोपरगाव तालुक्यातील वारी येथील राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत तेलबिया संशोधन केंद्र, जळगाव व तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (दि.8) शेतकरी दिन अर्थात सहकाराचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त वारीतील मधुकरराव टेके यांच्या वस्तीवर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेअंतर्गत तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. या याप्रसंगी पोपटराव खंडागळे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती मच्छिंद्र टेके होते.
    याप्रसंगी व्यासपीठावर कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे, उप कृषी अधिकारी सुनील गावित, मंडळ कृषी अधिकारी अपूर्वा वामन, वारीच्या कृषी सहाय्यक मनीषा पांगरेकर, सडे येथील कृषी सहाय्यक एस.जी. तमनर, वारीचे ग्रामपंचायत अधिकारी संग्राम बोर्डे, गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे, बाजार समितीचे संचालक प्रकाश गोर्डे, बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके, माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर टेके, टेके पाटील ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके, माजी उपसरपंच दिवाकर निळे उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व ग्रामपंचायत सदस्य राहुल दादा टेके पाटील यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार व पूजन करून सुरुवात करण्यात आली. यावेळी ट्रस्टच्यावतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेदरम्यान कृषी तज्ज्ञ पोपटराव खंडागळे व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी उपस्थित शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे अभ्यासपूर्ण उत्तर देत शंकांचे निरसन केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील पाटील चॅरिटेबल ट्रस्ट व गोदामाई प्रतिष्ठान ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने मान्यवरांच्या हस्ते एक वटवृक्ष व अकरा बांबू वृक्षाचे रोपण करण्यात आले.
     कार्यशाळेप्रसंगी ह.भ.प. विनायक महाराज टेके, वाल्मीक जाधव, राजेंद्र काजळे, संदीप काजळे, संदीप भाकरे, व्यंकटराव धट, मंगेश सिनगर, अनिल भाटी, मच्छिंद्र गांगड, राजेंद्र टेके, संजय टेके, साहेबराव टेके, दिलीप टेके, भाऊसाहेब टेके, संजय थोरात, अनिल गोरे, उमाकांत टेके, योगेश झाल्टे, साहेबराव टेके, अजीम शेख, बाबासाहेब थोरमिसे, नाना गाडगे, सुकृत गोर्डे, विशाल टेके, रवींद्र टेके, सुधाकर ठोंबरे, महेश टेके, गोरख जगताप, मच्छिंद्र टेके, अशोक गोरे, नानासाहेब गोर्डे, शिवाजी टेके, छबुराव चव्हाणके, अशोक मलिक, गणेश मलिक, नंदू जाधव, वेडू मोकळ, विकास शिंदे, सुनील गोर्डे, विजय काळे, सुरज टेके, स्वप्निल टेके, मंगेश आदमने, विकास टेके, श्रीरंग गिरे, वाल्मीक चव्हाण, रितेश सोनवणे, विलास गोंडे, शंकर गोंडे, कोंडीराम मंचरे, उत्तम वाकचौरे, दीपक झाल्टे, विनायक सिनगर, दादासाहेब सिनगर, कल्याण टेके, आकाश टेके, अक्षय टेके, पुरुषोत्तम टेके, शुभम टेके, चेतन निळे बाबासाहेब थोरमिसे, विकास बिरुटे, गोपी जगताप, अविनाश बारसे, राजवर्धन टेके,जयवर्धन टेके यांच्यासह वारी तसेच कान्हेगाव, सडे, भोजडे, धोत्रे, बापतारा पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. टेके पाटील ट्रस्टच्यावतीने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व कार्यक्रमाच्या ठिकाणी चहा व अल्पोहपाराची व्यवस्था करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ट्रस्टचे अध्यक्ष पत्रकार रोहित टेके यांनी केले. मान्यवरांचे स्वागत ह.भ.प.डॉ. सर्जेराव महाराज टेके यांनी केले. सूत्रसंचालन कैलास शेळके यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी माजी ग्रामपंचायत सदस्य गोरख टेके यांनी आभार मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!