banner ads

द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम सुरू न केल्यास उपोषण

kopargaonsamachar
0

 द्वारकानगरी ते शंकरनगर रस्त्याचे काम सुरू न केल्यास उपोषण

कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव येथील. द्वारकानगरी  ते शंकरनगर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या महिला, जेष्ठ नागरिक तसेच शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे.नगरपालिकेने १४ ऑगस्ट पर्यंत सदर रस्त्याचे काम सुरू न केल्यास साखळी उपोषणाचा इशारा तेथील रहिवाशांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नातून हद्दवाढ झालेल्या भागासाठी भरघोस निधी मिळूनही काही रस्त्यांची कामे रखडली आहेत. रखडलेले रस्ते नागरिकांच्या मुळावर उठत असुन छोटे मोठे अपघात होत आहे.  सदरचे निवेदन तहसिलदार, पोलिस निरीक्षक, नगरपालिका मुख्याधिकारी तसेच आमदार आशुतोष काळे यांना देण्यात आले आहे. यावेळी माधव पोटे, भाऊसाहेब गंगावणे, प्रकाश सूर्यवंशी, बाळासाहेब तरवडे, रामचंद्र रामणी, भास्कर घनघाव, कुंडलिक शिरसाठ, निवृत्ती वाकचौरे, सुभाष क्षीरसागर, सचिन गवारे, संदिप कपिले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!