banner ads

सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु

kopargaonsamachar
0

 सौ. सुशीलामाई काळे महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
ग्रामीण भागातील मुलींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी स्व. सौ.सुशीलामाई काळे यांच्या आग्रहास्तव स्व. कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोळपेवाडी येथे अडीच दशकापूर्वी महाविद्यालय सुरु केले. त्यामुळे हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण झाले. त्यापैकी काही विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पदव्युत्तर शिक्षण देखील पूर्ण झाले ज्यांची परिस्थिती बाहेरगावी जावून पदव्युत्तर शिक्षण घेण्याची होती. मात्र ज्यांची परिस्थिती नव्हती त्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे स्वप्न मात्र अधुरेच राहत होते.याची दखल घेत आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात एम. ए., एम. कॉम. व  एम. एस.सी. हे अभ्यासक्रम सुरू केले. त्यामुळे यापुढे एकाही विद्यार्थ्याचे पदव्युत्तर शिक्षण घेण्याचे स्वप्न अधुरे राहणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्ञानाच्या कक्षा रुंदावण्यासाठी उपलब्ध संधीचा फायदा घेवून आपले उज्वल भविष्य घडवावे असा मौलिक सल्ला सौ.चैताली काळे यांनी दिला.

कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सौ.सुशीलामाई काळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेने एम. ए. (इतिहास), एम. कॉम. व  एम. एस.सी. (केमिस्ट्री व बॉटनी) हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहे. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच प्रथम वर्षातील कला,वाणिज्य व विज्ञान या शाखेचे विद्यार्थी-विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या सचिव सौ.चैताली काळे व संस्थेचे इन्स्पेक्टर प्रा.नारायण बारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.यावेळी विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.

त्या पुढे म्हणाल्या की, कोपरगाव तालुक्यातील विद्यार्थ्यांना पदवी शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी शहरांकडे जावे लागायचे. अनेक वर्षांपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची मागणी होती. ही मागणी आ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातून पूर्ण झाली असून पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी महाविद्यालय प्रशासन कुठेही कमी पडणार नाही तुमचे भविष्य घडवायचे हा एकच उदेश डोळ्यासमोर ठेवून संस्था काम करीत आहे. शिक्षण हे केवळ नोकरीसाठी नसून, स्वतःचा सर्वांगीण विकास करण्याचे माध्यम आहे. त्यामुळे पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधेचा लाभ घेवून  पुढील जीवनाच्या वाटचालीसाठी स्वतःला सक्षम करा असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ.विजया गुरसळ यांनी केले. तृतीय वर्षातील विद्यार्थी तसेच नवीन प्रवेशित विद्यार्थी यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.साक्षी सैंदर व कु.पल्लवी कडलग यांनी केले. प्रा.पांडुरंग मोरे यांनी आभार मानले.पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

     

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!