banner ads

बालनाट्य स्पर्धेत आत्मा मालिकची नेत्रदीपक कामगिरी

kopargaonsamachar
0

 बालनाट्य स्पर्धेत आत्मा मालिकची नेत्रदीपक कामगिरी


तीन पुरस्काराचे मानकरी

कोपरगाव (लक्ष्मण वावरे )  
हायजिन फर्स्ट या संस्थेच्या वतीने आयोजित ‘अन्नसुरक्षा जनजागृती’ या आंतरशालेय बालनाट्य स्पर्धा २०२५-२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला. या बालनाट्य स्पर्धेत आत्मा मालिकने नेत्रदिपक कामगिरी केली असून तीन पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.
स्वच्छ परिसर, स्वच्छ किचन व वैयक्तिक स्वच्छता या गटांमध्ये आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाने ‘प्रथम’ क्रमांक पटकाविला, तसेच बालनाट्य स्पर्धा ही लहान व मोठ्या अशा दोन गटात पार पडली होती. आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलाच्या “स्वच्छमं राज्यमं” या मोठ्या गटातील बालनाट्यासाठी प्रथम क्रमांक तर आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाच्या “अन्नपूर्णा खानावळ” या लहान गटातील बालनाट्यासाठी द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

यावेळी बोलताना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट कोकमठाणचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी म्हटले की, आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलामध्ये सांस्कृतिक विभागातर्गत कला, नृत्य, अभिनय, संगीत या विद्यार्थ्यांमधील कलागुणांना अनुभवी व तज्ञ मार्गदर्शकाकडुन विकसित करण्याचे काम केले जाते. म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे. हे यश विद्यार्थ्यांना राज्यस्तरीय बालनाट्य स्पर्धा करिता निश्चितच प्रेरणा देणारे आहे. यावेळी त्यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या बालनाट्यासाठी संस्कृतिक विभागाचे सहाय्यक व्यवस्थापक आत्मदर्शन बागडे यांनी विशेष मेहनत घेतली तर स्वच्छ परिसर व स्वच्छ किचन यासाठी सुनील खरात व नितीन शिंदे यांनी परिश्रम घेतले. या विद्यार्थ्यांना वसंत  नारद, गणेश महाराज जाधव, ओमकार गंभीरे, आकाश खंडागळे यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे प.पू. आत्मा मालिक माऊलींच्या कृपाआशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी,  बाळासाहेब गोर्डे उपाध्यक्ष, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, वसतीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल, प्राचार्य निरंजन डांगे, प्राचार्य माणिक जाधव सर्व विभाग प्रमुख यांनी अभिनंदन केले.

--
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!