banner ads

परम सदगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन

kopargaonsamachar
0

 परम सदगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळ्याचे आयोजन


कोपरगाव / लक्ष्मण वावरे 

अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव बेट येथे  

जगातील एकमेव असलेल्या  दैत्यगुरू श्री शुक्राचार्य मंदिरामध्ये सदगुरू शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव-पार्वती विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात साधु, महंतांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असल्याची माहिती परम सदगुरू शुक्राचार्य महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी दिली 

श्री.क्षेत्र बेट कोपरगाव येथे परम सदगुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही  पवित्र श्रावण महिन्यात येणाऱ्या मिती शके १९४७ श्रावण शुध्द अष्टमी शुक्रवार दिनांक १ ऑगस्ट रोजी परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज जन्मोत्सव व शिव पार्वती विवाह सोहळ्या निमित्त सकाळी ९ वाजता श्री परम सद्गुरूंचे आगमन त्यानंतर ०९.३० वाजता श्री गुरु शुक्राचार्य मुखवटा स्थापन व पुण्याहवाचन त्यानंतर श्री परम सद्गुरूंची भव्य पालखीची मिरवणूक संपन्न झाल्यावर १०.३० वाजता शुक्र जन्मोत्सव व शिवपार्वती विवाह सोहळा संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती  महंत रमेशगिरीजी महाराज ,कोकमठाण येथील जंगली महाराज आश्रमाचे  महंत परमानंदजी महाराज व कुंभारी येथील श्री राघवेश्वर देवस्थानचे महंत राघवेश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते व कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे त्यानंतर दुपारी १२ वाजता मध्यान महाआरती होईल व त्यानंतर आलेल्या सर्व भाविक भक्तांसाठी अमोल अशोक भुसारे, आनंद दत्तात्रेय टिळेकर, आशिष अंबादास कोल्हे, सतीश सुभाष कोतकर, तुषार प्रवीण जमदाडे, चंद्रशेखर भास्कर राहणे यांच्या वतीने सर्व भावी भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले आहे  या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड सचिव ॲड संजीव कुलकर्णी, खजिनदार ॲड.गजानन कोऱ्हाळकर सदस्य सुहास कुलकर्णी, हेमंत पटवर्धन तसेच सर्व ट्रस्टी, मंदिर प्रशासन, सर्व बेट ग्रामस्थ, ब्रह्मवृंद, कर्मचारी तसेच बेटातील सर्व तरुण मंडळे मित्रपरिवार व शिव-शुक्र भक्त गण यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!