banner ads

जिजामाता उद्यान विकास कामांच्या ५० लाखाच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध- कृष्णा आढाव

kopargaonsamachar
0

 जिजामाता उद्यान विकास कामांच्या ५० लाखाच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध- कृष्णा आढाव


कोपरगाव/ लक्ष्मण वावरे
- कोपरगाव शहराचे वैभव असलेल्या शहरातील जिजामाता उद्यानाचा विकास व्हावा अशी कोपरगाव शहरातील नागरिकांसह तमाम महिला भगिनींची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी आणलेल्या ५० लाखाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली होती व या कामाच्या निविदा देखील प्रसिद्ध झाल्या आहेत. त्याबद्दल कोपरगाव शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी सांगितले आहे.


नागरीकांच्या अडचणी समजून घेऊन त्या अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध असणारे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नाबरोबरच कोपरगाव शहराचा विकास साधला आहे. त्याचबरोबर विकासाचे उर्वरित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू असतो. हा पाठपुरावा सुरू असतांना निधी मिळविण्यापासून त्या त्या कामांना प्रशासकीय मंजुरी व कामाच्या निविदा प्रसिद्ध होईपर्यंत अथकपणे सुरूच असतो. त्याचाच एक भाग असणाऱ्या जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी निधी मिळवून देवून आज प्रत्यक्षात विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध झाल्या आहेत.
कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र गोदामाईच्या किनाऱ्यावर असलेले जिजामाता उद्यान महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठिकाण आहे. परंतु सोयी सुविधांचा अभाव असल्यामुळे या जिजामाता उद्यानाचा विकास व्हावा अशी कोपरगाव शहरातील नागरिकांसह तमाम महिला भगिनींची मागणी होती. या मागणीची आ.आशुतोष काळे यांनी दखल घेवून ५० लाख रुपये निधी जिजामाता उद्यानाच्या विकासासाठी दिल्यामुळे होणाऱ्या विकास कामांमुळे उद्यानाचा पूर्णपणे चेहरामोहरा बदलणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष कृष्णा आढाव यांनी सांगितले आहे.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!