banner ads

शिर्डी ही श्रद्धेची, भक्तीची आणि अध्यात्मिक उन्नतीची जागा -- आ.आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 

शिर्डी ही श्रद्धेची, भक्तीची आणि अध्यात्मिक उन्नतीची जागा -- आ.आशुतोष काळे

साईसच्चरित  पारायण कथा सोहळ्याला आ.आशुतोष काळेंची सदिच्छा भेट

कोपरगाव ( लक्ष्मण वावरे)

शिर्डी ही केवळ एक तीर्थक्षेत्र नाही, तर ती श्रद्धेची, भक्तीची आणि अध्यात्मिक उन्नतीची जागा आहे. इथे साईबाबांच्या चरणी आले की, मनाला एक विशेष शांतता आणि समाधान मिळते. श्री साई सच्चरित पारायणाच्या या पवित्र सोहळ्यात सहभागी होण्याचा योग आला, हे मी माझं भाग्य समजतो. पारायण कथा केवळ धार्मिक कार्यक्रम नसतात, तर त्या साईबाबांच्या शिकवणींचं स्मरण करून देणाऱ्या आणि जीवनाला सकारात्मक वळण देणाऱ्या असतात असे आ.आशुतोष काळे यांनी म्हटले.

शिर्डी येथे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, नाट्य रसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई सच्चरित पारायण सोहळा अत्यंत भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडत आहे.गुरुवार (दि.३१) रोजी  आ.आशुतोष काळे यांनी साईमंदिरात साईबाबांचे दर्शन घेवून या पारायण सोहळ्याला सदिच्छा भेट दिली व पारायणार्थी साई भक्तांना शुभेच्छा दिल्या. त्या प्रसंगी ते बोलत होते.
.मागील तीस वर्षापासून श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी, नाट्य रसिक मंच शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याचे भव्य दिव्य आयोजन केले जाते. या पारायण सोहळ्यासाठी देशभरातून साईभक्त उपस्थित असतात.दरवर्षी साई कथा पारायण सोहळ्यासाठी बसणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून साई सच्चरित पारायण सोहळ्याचे स्वरूप देखील दरवर्षी मोठे होत चालले आहे.
श्री साईबाबा हे श्रद्धा आणि सबुरीचे सर्वोच्च प्रतीक आहे. शिर्डी हे संपूर्ण जगभरातील भक्तांचे श्रद्धास्थान आहे. साईबाबांच्या पवित्र भूमीत, साई सच्चरित पारायणाच्या या मंगल सोहळ्यात मला सहभागी होण्याचा योग आला, हे माझे सौभाग्य आहे. साईबाबांचा सर्व साईभक्तांवर कृपा व्हावी व सर्व पारायणार्थी साई भक्तांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशा शुभेच्छा आ.आशुतोष काळे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, नाट्य रसिक मंचचे सदस्य अशोक नागरे, रमेश गोंदकर,अशोक कोते, प्रकाश गायके, सुभाष घुगे, साबळे व महिला पारायणार्थी  मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. तसेच शिर्डी राष्ट्रवादीचे पदाधिकारी अमित शेळके, दीपक गोंदकर आदी मान्यवरांसह साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!