banner ads

राजेश परजणे यांची संजीवनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी निवड

kopargaonsamachar
0

 राजेश परजणे यांची संजीवनी पतसंस्थेच्या  अध्यक्षपदी निवड 


संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या हस्ते सत्कार 

कोपरगांव  / लक्ष्मण वावरे


             जिल्हयात अग्रणी असलेल्या संजीवनी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी राजेश सखाहरी परजणे यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली त्याबददल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.
              संजीवनी पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची निवड मंगळवारी झाली यासाठी तालुका सहायक निबंधक प्रदिप रूद्राक्ष यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.त्यांचा सत्कार अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान यांनी केला.राजेश परजणे यांच्या नावाची सुचना मावळते अध्यक्ष प्रदिप नवले यांनी केले तर त्यास संचालक राजेंद्र बागुल यांनी अनुमोदन दिले.
. बिपीनदादा कोल्हे याप्रसंगी बोलतांना म्हणाले की, बदलत्या मुक्त अर्थव्यवस्थेत पंतसंस्थांच्या आर्थीक स्थैर्यासाठी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी गुणात्मक काम करत संजीवनी पतसंस्थेचा नांवलौकीक वाढविला. आज आपली संस्था जिल्हयात अग्रणी आहे. शेतकरी सभासदाबरोबरच पतसंस्थेवर अवलंबुन असणा-या विविध घटकांच्या प्रगतीत मोलाचे योगदान दिले आहे.

 सत्कारास उत्तर देतांना . राजेश परजणे म्हणाले की, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे युवा अध्यक्ष व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली संजीवनी पतसंस्थेचा अध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मावळते अध्यक्ष प्रदिप नवले म्हणांले की, संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली सहकारी संस्थेत विविध पदावर काम करतांना खुप शिकायला मिळाले.
  याप्रसंगी अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, संजीवनी पतसंस्थेचे उपाध्यक्ष संदिप गुरूळे, संचालक भाउसाहेब आदिक, श्रीकांत चांदगुडे, गणपत राउत, अनंत पाटील, महेंद्र नाईकवाडे, शिवाजीराव लहारे, जयराम सांगळे, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विश्वासराव महाले, त्रंबकराव सरोदे, बाळासाहेब वक्ते, सतिष आव्हाड, ज्ञानेश्वर परजणे, बापुसाहेब बारहाते, रमेश घोडेराव, संभाजीराव बोरनारे, महेश परजणे, मुकुंद काळे आदि उपस्थित होते. शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही. व्ही. रोहमारे यांनी आभार मानले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!