banner ads

आत्मा मालिक इंग्लिश मीडियम कोकमठाणच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल कामगिरी

kopargaonsamachar
0

 आत्मा मालिक इंग्लिश मीडियम कोकमठाणच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल कामगिरी 


गुणवत्ता यादीत ठसा

कोपरगाव / लक्ष्मण वावरे
 महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ च्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक (इयत्ता ८ वी) शिष्यवृत्ती परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनिअर कॉलेजच्या सात विद्यार्थ्यांनी गुणवत्तेची परंपरा कायम ठेवत गुणवत्ता यादीत आपली नावे कोरले आहेत.

इयत्ता ५ वीतून चि.धैर्य प्रवीण अवताडे याने २३२ गुण मिळवून जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. तसेच इयत्ता ८ वीतून चि. साईश नितीन अनाप व महेश गोरख जाधव यांनी प्रत्येकी २२४ गुण मिळवले आहेत. कु.श्रावणी ज्ञानेश्वर तासकर हिने २१० गुण, चि. समर्थ प्रमोद जाधव याने २०८ गुण, कु. गार्गी सुजीत भास्कर हिने १९८ गुण तर आदिवासी विकास विभाग अंतर्गत नामांकित योजनेतून प्रवेशित झालेली कु. अंकिता सोमनाथ पोतिंदे हिने १९२ गुण मिळवून आपले नाव गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांमध्ये कोरले आहे.

या यशाबद्दल शाळेचे प्राचार्य माणिक जाधव म्हणाले, “विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, शाळेच्या वेळेव्यतिरिक्त विशेष तास घेणे व परीक्षेचा सातत्यपूर्ण सराव घेणे या शिक्षकांच्या अथक परिश्रमामुळेच हे यश शक्य झाले आहे.”

या यशस्वी कामगिरीसाठी प्राचार्य माणिक जाधव, मीनाक्षी काकडे, नितीन सोनवणे, विभाग प्रमुख दिनेश शिरसागर, दर्शना ठाकूर, भाऊसाहेब जावळे, भारती ताठे तसेच भुजाडे चित्रा , मन्सूरी रुक्सार , तांबे सारिका , शिंदे दिपा, वाणी योगेश, औताडे अपर्णा, आरती मुळीक, आहेर निकिता ,चव्हाण अंजली, पाटील आरती, उदावंत राणी, गुढघे कोमल, वाजे नारायण, बारहाते कावेरी, सोफिया शेख सय्यद, गाढवे किरण  यांचे विशेष योगदान राहिले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल आत्मा मालिक माऊली यांचे कृपाआशीर्वादासह, संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, सरचिटणीस हनुमंत भोंगळे, उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदिपकुमार भंडारी, सर्व ट्रस्ट मंडळ, व्यवस्थापक सुधाकर मलिक, साईनाथ वर्पे, मीरा पटेल, सर्व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



--

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!