हिमाचल च्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतले गुरू शुक्राचार्य महाराजांचे दर्शन
कोपरगाव/ लक्ष्मण वावरे
हिमाचलप्रदेशाचे उपमुख्यमंत्री व परम शुक्रभक्त मुकेश अग्निहोत्री यांनी त्यांच्या कन्या डॉ आस्था अग्निहोत्री व त्यांच्या सहकाऱ्यांसह कोपरगाव बेट येथे असलेल्या जगातील एकमेव शुक्राचार्य मंदिरात येत श्री शुक्राचार्य महाराज यांचे मनोभावे दर्शन घेत महापूजा, महाआरती केली आहे.
उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री हे
शुक्राचार्य मंदिरात शुक्राचार्य महाराजांचे दर्शन व आशीर्वाद घेण्यासाठी तिसऱ्यांदा आले असून
शुक्राचार्य महाराजांच्या कृपेचा आलेला अनुभव पाहता आता मी दर वर्षी दर्शनासाठी येणार असल्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी सांगितले आहे.
याच बरोबर मुकेश अग्निहोत्री यांची
कन्या डॉ आस्था अग्निहोत्री हिच्या शुभ विवाहासाठी त्यांनी मंदिरात अभिषेक पूजा करत महाराजांना अभिषेक अर्पण केला आहे
यावेळी अग्निहोत्री यांनी मंदिरात झालेले बदल याच बरोबर महाराजांची सुंदर व प्रसन्न मूर्ती ची मुक्त कंठाने स्तुती केली असून आपल्या मंदिर भेटीचा आवर्जुन उल्लेख हिमाचल प्रदेश मध्ये करणार असल्याचे सांगत
पूजा व स्वागत व सत्कार या बद्दल त्यांनी मंदिर प्रशासनाचे आभार मानले आहे.
यावेळी शुक्राचार्य देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड ,
नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते , शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, भाऊसाहेब शिंदे, हेमंत पटवर्धन, कैलास आप्पा आव्हाड, मधुकर साखरे, मुन्ना आव्हाड, भागचंद रुईकर, दिलीप सांगळे,विकास शर्मा, बाबा आव्हाड,विनोद नाईकवाडे
किरण आव्हाड, विजय जाधव, विजय रोहम, दत्तात्रय सावंत, बाबासाहेब कापे, आप्प्पा आव्हाड, रामनाथ कदम
समिर आबोरे, सुशांत घोडके, अभिषेक आव्हाड, संदिप आव्हाड
विलसनाना आव्हाड,नामदेव आव्हाड भोल्या गीते आदींसह मोठ्या संख्येने भाविक भक्त, नागरिक उपस्थित होते.





