banner ads

आषाढी एकादशी निमित्त धारणगाव ग्रामपंचायतीस वैकुंठ रथ भेट

kopargaonsamachar
0

 आषाढी एकादशी निमित्त धारणगाव ग्रामपंचायतीस वैकुंठ रथ भेट

कोपरगाव / लक्ष्मण वावरे 
आपल्या माणसांसाठी आपली माणसं काहीतरी देतात तेव्हा गाव मोठं होतं आणि संस्कृती घडत जाते याच भावनेतून धारणगावातील गोडगे परिवार  संपतराव निवृत्ती  गोडगे यांचे वतीने त्यांचे तीनही चिरंजीव राजेंद्र, डॉ विजय, व संदीप यांनी आषाढी एकादशीचे औचित्य साधून ग्रामपंचायतीस वैकुंठ रथ भेट दिला यावेळी उपसरपंच  बाबासाहेब वाघ व गोडगे परिवारातील  राजेंद्र गोडगे यांचे वतीने विधिवत रथाचे पूजन करण्यात आले.

 या प्रसंगी ग्रामपंचायत च्या वतीने उपसरपंच बाबासाहेब वाघ, सदस्य संदीप थोरात,सूरज रणशूर,तसेच सुदर्शन कुहिते यांचे हस्ते गोडगे परिवारातील सदस्यांचा सत्कार करण्यात आला गावचे भूषण ह भ प अनंतमहाराज वहाडने यांनी या उपक्रमाचे कौतुक केले याच ठिकाणाहून  सालाबाद प्रमाणे श्री क्षेत्र धारणगाव ते  श्री क्षेत्र प्रति पंढरी कोटमगाव पाईदिंडीचे प्रस्थान झाले.गावातील सर्व भाविक,नागरिक महिला भगिनी गावातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते 
यावेळी मा. सरपंच दीपक चौधरी आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की आजचा हा दिवस केवळ आषाढी एकादशीचा पावन दिवस म्हणूनच नाही, तर आपल्या गावाच्या इतिहासात एक सामाजिक व आध्यात्मिक महत्त्व असलेला दिवस म्हणूनही लक्षात राहणार असून  धारणगावात तीस पस्तीस वर्षापासून स्थायिक होऊन आपलं घर, आपला व्यवसाय आणि समाजकार्य यामध्ये रुळून गेलेल्या गोडगे पाटील परिवाराने ग्रामपंचायतीला वैकुंठ रथाची दिलेली भेट ही एक अत्यंत उदात्त आणि समाजशील भावना दाखवणारी गोष्ट सांगत ज्या दिवशी साक्षात विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो वारकरी पायी चालत पंढरीची वाट धरतात, त्या आषाढी एकादशीच्या शुभदिनी असा पुण्य कार्याचा सोहळा आपल्या गावात होत आहे, हीच एक दैवी योगायोगाची जाणीव करून देते.
वैकुंठ रथ म्हणजे केवळ एक वाहन नव्हे,
तर तो आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या शेवटच्या यात्रेला मिळणारा सन्मान, श्रद्धा आणि प्रतिष्ठा आहे.
शहरांमध्ये अशा सुविधा मिळतात, पण गावाकडं अजूनही त्या मर्यादित असतात. अशा वेळी गोडगे कुटुंबीयांनी ही संधी ओळखून दिलेली ही भेट, त्यांच्या गावप्रेमाची आणि समाजशीलतेची साक्ष आहे.आजचा हा लोकार्पण सोहळा गावच्या इतिहासात सन्मानाने नोंदवला जाईल असेही दीपक चौधरी म्हणाले.
 ग्रामपंचायतीच्या वतीने आणि संपूर्ण गावकऱ्यांच्या तर्फे, या कुटुंबाचे मन:पूर्वक आभार मानत त्यांचे मनापासून अभिनंदन करन्यात आले.

 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!