banner ads

खिर्डी गणेश परीसरात बिबट्याचा धुमाकूळ

kopargaonsamachar
0

 खिर्डी गणेश परीसरात बिबट्याचा धुमाकूळ 

कोपरगाव / लक्ष्मण वावरे 
तालुक्यातील टाकळी फाटा, वराडे वस्ती, अचानक नगर परिसरात  बिबट्याची जोडी आढळली असून ही बिबट्याची जोडी गेल्या आठ दिवसा पासून रात्री बे रात्री राजरोजपणे फिरत असल्याने या परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. ज्येष्ठ कार्यकर्ते प्रदीप नवले यांच्या उसाच्या शेतात एका बिबट्याने दर्शन दिले, त्याचा फोटो कुणाल लोणारी यांनी काही फुटावरून काढला, त्यामुळे बिबट्याची दहशत कायम असून तातडीने वनविभागाने पिंजरे लावावे अशी मागणी प्रदीप नवले यांनी केली आहे. मात्र वनविभागाकडे पिंजरे शिल्लक नसल्याच सांगण्यात आलं आहे.

 वनविभागाच्या वतीने आता बोकड, अथवा मांसाहारी पदार्थ परिसरात ठेवावे म्हणून सल्ला देण्यात आला, त्यानुसार आता वर्गणी गोळा करून त्याची तजवीज केली जात आहे असे प्रदीप नवले यांनी सांगितले. बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिक शाळेत, कॉलेजात येणारे विद्यार्थी प्रचंड दहशतीखाली वावरत आहेत.                   या बिबट्यांनी चार शेळ्यां मारल्या आहेत, अमोल वराडे यांच्या वस्ती वर बिबट्या ला पळून लावण्यासाठी वस्तीवरील नागरिकांनी १०० फुटावरून लाठ्या काठ्या घेऊन पाठलाग केला, मात्र ते बिबटे उसाच्या शेतात लपण्यात यशस्वी झाले.
टाकळी फाट्यावरुन संजीवनी कॉलेज, कारखाना, रेल्वे स्टेशनला मोटारसायकलवरून, पायी जाणाऱ्यांनी रात्री सावध रहावे असे आवाहन प्रगतशील शेतकरी प्रदीप नवले, परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केले आहे. वनविभागाच्या वतीने एक पिंजरा लावण्यात आला आहे. गेल्या २४ तारखेपासून ते बिबटे या परिसरात आहेत, अमोल वराडे यांच्या चार एकर उसाच्या परिसरात ते लपले आहेत. त्यामुळे संजीवनी इंग्लिश मीडियम स्कूल परिसर, धोंडीबा नगर, अचानक नगर, खिर्डी गणेश परिसरात मोठी दहशत पसरली आहे.
या बिबट्यांनी गोविंद नगर परिसरातील चार जणांच्या मालकीच्या शेळ्या बकऱ्या मारून खाल्ल्या आहेत, त्यांचे पंचनामे करण्यात आले आहेत असे शेतकरी अमोल दराडे यांनी सांगितले. तसेच दिनांक २५ रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान एक कर्मचारी कामावर जात असताना त्याच्यावर बिबट्याने झेप घेतली होती मात्र तो त्यातून बालम बाल बचावला व बेशुद्ध पडला होता असेही वराडे म्हणाले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या परिसरात भेट देऊन एक पिंजरा लावला असून आणखीन दोन पिंजरे लावण्यात यावे म्हणून या परिसरातील शेतकरी नागरिकांची मागणी आहे.                                              

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!