banner ads

एस एस जी एम च्या विद्यार्थ्यांना साऊथ कोरियात उच्च शिक्षणाची संधी

kopargaonsamachar
0

 एस एस जी एम च्या विद्यार्थ्यांना साऊथ कोरियात उच्च शिक्षणाची संधी" डॉ. रवींद्र बुलाखे 


कोपरगाव/ लक्ष्मण वावरे 
एस एस जी एम महाविद्यालय कोपरगाव यांनी SKKU युनिव्हर्सिटी, साउथ कोरिया यांच्याशी केलेल्या सामंजस्य करारा अंतर्गत दिनांक 25 जुलै 2025 रोजी "संशोधनातील विविध संधी" या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेकरिता  डॉ. रवींद्र बुलाखे, SKKU युनिव्हर्सिटी, साऊथ कोरिया  यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की SKKU, युनिव्हर्सिटी ही एस एस जी एम महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची द्वारे खुली करून देत आहे आणि त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. डॉ. रवींद्र बुलाखे यांनी त्यांच्या संशोधनाची सखोल माहिती विद्यार्थ्यांना करून दिली तसेच संशोधनाच्या विविध संधी याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ. सरोदे एम. टी. यांनी आपल्या मनोगतामधून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सामंजस्य करारा अंतर्गत साऊथ कोरिया येथे उच्च शिक्षण घ्यावे अशी इच्छा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी डॉ. विलास गाडे यांनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.  विलास गाडे यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे आणि प्राध्यापिका प्रियंका पवार यांनी केले. डॉ. प्रतिभा रांधवणे यांनी आभार प्रदर्शन केले. महाविद्यालयाचे उपप्राचार्य  डॉ. घनश्याम भगत तसेच रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र या विभागातील सर्व प्राध्यापक या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!