banner ads

गुरु हे जीवनातील प्रकाश --बिपीनदादा कोल्हे

kopargaonsamachar
0

 गुरु हे जीवनातील प्रकाश --बिपीनदादा कोल्हे


गुरुपौर्णिमे निमित्त कोल्हे यांनी घेतले वंदनीय महंतांचे दर्शन

कोपरगाव / लक्ष्मण वावरे


 राष्ट्रसंत सदगुरु जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज आश्रम, बेट कोपरगाव येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावात पार पडला. या पावन सोहळ्यात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी उपस्थित राहून वंदनीय महंतांचे दर्शन घेतले व त्यांच्याकडून आशीर्वाद प्राप्त केला.
गुरुपौर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रमात मठाधिपती गुरुवर्य प.पू. स्वामी रमेशगिरी महाराज, परमश्रद्धेय स्वामी माधवगिरी महाराज, १००८ महामंडलेश्वर प.पू. स्वामी शिवगिरीजी महाराज, प.पू. स्वामी ज्ञानानंदगिरी महाराज, प.पू. साध्वी शारदानंद माताजी, प.पू. स्वामी भोलेगिरी महाराज, प.पू. स्वामी गणेशगिरी महाराज, प.पू. स्वामी दिनेशगिरी महाराज, प.पू. स्वामी राघवेश्वरानंदगिरी महाराज, प.पू. स्वामी विकासगिरी महाराज आदी वंदनीय संत-महंत, तसेच शिवभक्त भाऊ पाटील यांची उपस्थिती लाभली.

बिपीनदादा कोल्हे यांनी या सर्व संतांचे पूजन करून, त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली. या निमित्ताने त्यांनी गुरुपौर्णिमेचे अध्यात्मिक महत्त्व विशद करत सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या. "गुरु हे जीवनातील प्रकाश आहेत, त्यांच्या मार्गदर्शनामुळेच समाज घडतो, मूल्य टिकतात आणि श्रद्धेचा दीप सतत तेवत राहतो," असे कोल्हे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला जनार्दन स्वामी महाराज ट्रस्टचे अध्यक्ष बाळकृष्ण होळकर, ट्रस्टचे विश्वस्त, पंचक्रोशीतील जय जनार्दन भक्त परिवार व इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तगणांनी हरिनाम संकीर्तन, कीर्तनसेवा, महाप्रसाद अशा अध्यात्मिक वातावरणात सहभागी होत गुरुपौर्णिमा सोहळ्याचा आनंद घेतला.या उत्सवाने कोपरगाव परिसरात अध्यात्म, भक्ती आणि श्रद्धेचा संगम घडवला.

कोपरगाव शहरातून गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त पूर्वसंध्येला मठाधिपती प. पूज्य महंत रमेशगिरीजी महाराज यांची स्वामी जनार्दन प्रतिष्ठान आणि समस्त भक्तगणाच्या वतीने पुष्पवृष्टी करून मिरवणूक काढण्यात आली होती, यासाठी संजीवनी शिक्षण संस्थेचे ट्रस्टी सुमित कोल्हे यांनी उपस्थित राहून रमेशगिरीजी महाराज यांचे पूजन केले व आशीर्वाद घेतले.
 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!