banner ads

खो-खो मिश्र लिग स्पर्धेत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलचा दणदणीत विजय

kopargaonsamachar
0

  खो-खो मिश्र लिग स्पर्धेत आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुलचा दणदणीत विजय


कोपरगाव / लक्ष्मण वावरे 
श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूल, कोपरगाव यांच्या वतीने आयोजिलेल्या शारदा एक्सप्रेस खो-खो मिश्र लिग स्पर्धा २०२५ मध्ये आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल, कोकमठाण संघाने दणदणीत विजय मिळवत स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले.
या स्पर्धेचे आयोजन श्री शारदा इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेत जिल्हाभरातून तसेच येवला तालुक्यातून एकूण १३ संघांनी सहभाग घेतला होता. सर्व संघांची चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली होती. चुरशीच्या स्पर्धेनंतर आत्मा मालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल आणि दिग्विजय क्रीडा मंडळ भिंगार, अहमदनगर हे दोन संघ अंतिम फेरीत आमनेसामने आले. अंतिम सामन्यात आत्मा मालिक गुरुकुलच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत विजय संपादन केला आणि अजिंक्यपद आपल्या नावे केले.

स्पर्धेत प्रत्येक सामन्यानंतर उत्कृष्ट खेळाडूंना विशेष ट्रॉफीने गौरविण्यात आले. आत्मा मालिक संघातील पाच खेळाडूंनी हा बहुमान मिळवला. त्यात कु. वळवी मनीषा, चि. वळवी जितेंद्र, चि. मानकर तनिष,  चि. वसावे अमेश,  चि. वळवी रिंकू यांना उत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले. स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या संघाला ट्रॉफीबरोबरच २१००/- रुपयांचे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
या यशामागे क्रिडा प्रशिक्षक गोपाळ अण्णासाहेब , ऐनपूरे दिपाली,  अजित पवार, रविंद्र नेद्रे यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे प्राचार्य माणिक जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे परमपूज्य आत्मा मालिक माऊलींच्या कृपाआशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी , उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे, सरचिटणीस हनुमंतराव भोंगळे, कोषाध्यक्ष विठ्ठलराव होन, विश्वस्त प्रकाश गिरमे, प्रदीपकुमार भंडारी, शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक, प्राचार्य माणिक जाधव. वसतीगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे, वसतिगृह व्यवस्थापिका मीरा पटेल यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!