banner ads

कोपरगाव शहरात आणखी एका व्यापारी संकुलाच्या कामास होणार प्रारंभ

kopargaonsamachar
0

 कोपरगाव शहरात आणखी एका व्यापारी संकुलाच्या कामास होणार प्रारंभ-सुनील गंगुले


कोपरगाव/ लक्ष्मण वावरे 
 कोपरगाव शहराला विकासाच्या वाटेवर घेवून येणाऱ्या आ.आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून सोमवार (दि.०७) रोजी कोपरगाव शहरात कोपरगाव नगरपरिषद इमारती समोर आणखी एक व्यापारी संकुल उभारले जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे.

कोपरगाव शहरातील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ५ नं.साठवण तलावाची निर्मिती करून हा प्रश्न निकाली काढला आहे. शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणात दिलेल्या निधीतून रस्त्यांचे प्रश्न सुटले असून त्यामुळे कोपरगाव शहराच्या बाजारपेठेतील आर्थिक उलाढाल वाढण्यास मोठी मदत झाली आहे. अनेक शासकीय इमारतींची कामे प्रगतीपथावर असून उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आरोग्याचा प्रश्न देखील कायमचा मार्गी लागणार आहे. त्याचबरोबर बेरोजगार व गरजू नागरीकांना व्यवसायाच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तसेच कोपरगाव शहराची बाजारपेठ फुलविण्यासाठी कोपरगाव नगरपरिषदेच्या मालकीच्या मोकळ्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नातून कोपरगाव बस स्थानकाच्या लगत असलेल्या परिसरात १४ कोटीच्या व्यापारी संकुलाचे काम प्रगतीपथावर असतांना कोपरगाव शहरात आणखी एक व्यापारी संकुल उभारले जाणार आहे.
सोमवार (दि.०७) रोजी कोपरगाव नगरपरिषद इमारती समोर या व्यापारी संकुलाची पायाभरणी होणार असून या कामाचे भूमिपूजन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी कोपरगाव शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले यांनी दिली आहे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!