अलिशा खंडीझोड हिची ‘कास्य’ पदकाला गवसणी
कोपरगाव / लक्ष्मण वावरे
- रयत शिक्षण संस्थेच्या श्री सदुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स आणि संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथील प्रथम वर्ष कला विभागातील विद्यार्थिनी कु. अलिशा खंडीझोड' हिने दिनांक २५ ते२६ मे२०२५ या कालावधीत नेपाळ येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये ५५ किलो वजन गटात कास्यपदक संपादन केले.
तिच्या या चमकदार कामगिरीबद्दल रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन अॅड. भगीरथ शिंदे तसेच महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. विशाल पवार, सर्व प्राध्यापक, कार्यालयीन अधीक्षक . सुनील गोसावी यांनी अभिनंदन केले .





