आदिनाथ ढाकणे नदी प्रहरी पुरस्काराने राजस्थान येथे सन्मानित
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव येथील स्वच्छता दुत तथा गोदामाई सेवक आदिनाथ ढाकणे यांना ते करत असलेल्या गोदावरी नदी स्वच्छता कार्याची दखल घेऊन राजस्थान येथे तरुण भारत संघ राजस्थान यांच्या सुवर्ण जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात तरुण भारत संघाचे अध्यक्ष तथा आंतरराष्ट्रीय जलपुरुष राजेंद्र सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात नदी प्रहरी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आदिनाथ ढाकणे कोपरगाव येथील रहिवाशी असून ते आपल्या गोदामाई प्रतिष्ठान मार्फत गेल्या ३१६ आठवड्यापासून कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारा स्वच्छ करण्याचे काम करत आहे. तसेच त्यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग विषयी कोपरगावकरांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याचे काम केलेले आहे तसेच त्यांनी आतापर्यंत अनेक देशी औषधी वृक्षांची लागवड करत त्याचे संगोपन केले आहे ते कोपरगाव नगरपालिकेचे स्वच्छता जनजागृतीचे ब्रँड ॲम्बेसिडर तर महाराष्ट्र शासनाच्या चला जाणूया नदीला या उपक्रमाचे सदस्य आहेत त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहे तर याच त्यांच्या महान कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय जलपुरुष डॉ राजेंद्र सिंग यांच्या तरुण भारत संघटनेच्या वतीने नदीप्रहरी या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले असून त्यांना मिळालेल्या या सर्वोच्च मानाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






