संवत्सर येथिल कृषी औषधांचे दुकान चोरट्यांनी फोडले
पाच लाखाचा मुद्देमाल लंपास
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे शहरात घरफोडीचे सञ चालु असुन त्या चोरीचा तपास लागत नाही तोच आता चोरट्यांनी ग्रामिण भागातील कृषी सेवा केंद्राकडे मोर्चा वळवल्याने संवत्सर येथिल कृषीमित्र या दुकानाचे पत्रे उचकटुन रोख रक्कमेसह पाच लाख सतरा हजार रुपयांचा मुद्देमालासह दुकानातील सीसीटीव्ही ,डीव्हीआर चोरट्यानी चोरून नेल्याने पोलिसांपुढे नवे आव्हान उभे राहीले चोरीच्या या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की , कोपरगाव तालुक्यातील संवत्सर परिसरातील लक्ष्मणवाडी येथिल रहिवासी तसेच संवत्सर ग्रामपंचायचे सदस्य महेश शंकर परजणे यांचे संवत्सर परिसरात रोडच्या कडेला कृषीमित्र नावाचे खते, बी-बियाणे, किटक नाशके व शेती औजाराचे मोठे दुकान आहे. १ जून २०२५ रोजी परजणे यांनी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजेच्या सुमारास त्यांचे दुकान बंद करून ते आपल्या घरी गेले होते. १ जूनच्या रात्री नऊ नंतर ते २ जूनच्या सकाळी साडे आठच्या दरम्यान केव्हातरी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या पाठीमागील पत्रे उचकाटुन दुकानात प्रवेश करत दुकानातील रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, बी-बियाणे, कीटकनाशके, कृषीयंत्र साहित्य, सीसीटीव्ही कॅमेरा, डी व्ही आर व हार्ड डिस्क असा एकूण ५ लाख १७ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
सदर चोरीची घटना परजणे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान सदर घटनेचा पोलिसांनी पंचनामा करत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय पवार हे करीत आहे.
सदर चोरांचा तात्काळ तपास लावून गेलेला मुद्देमाल मिळावा अशी मागणी महेश परजणे यांनी पोलीस प्रशासनाकडे केली आहे.


.jpg)




