टाकळीच्या शेतकरी कन्येचा MPSC मध्ये यशाचा झेंडा
ग्रामस्थांनी केला भव्य नागरी सत्कार
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
वडीलांच्या जिद्दीमुळे व मुलीच्या दृढनिश्चय कामाला आला आणी कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील शेतकऱ्याची कन्या कु.प्रतिक्षा बाळासाहेब देवकर हिने (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षा मधून संपूर्ण महाराष्ट्रातून ४२ वा आणि महिलांमधून १० वा क्रमांक मिळवित यशाचा झेंडा रोवला.
प्रतिक्षा देवकर हिची सहाय्यक कार्यकारी अभियंता वर्ग १ राजपत्रित अधिकारी या पदावर निवड झाली कमी वयात तिने मिळविलेल्या या घवघवीत यशा बद्दल टाकळी ग्रामस्थांच्या वतीने तिचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी कोपरगाव तालुक्यातील विविध मान्यवर , तसेच टाकळी गावातील व पंचक्रोशीतील ग्रामस्थ , मित्र मंडळी आदी प्रमुख मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी वक्त्यांनी प्रतिक्षा बाळासाहेब देवकर हिच्या यशाबद्दल भरभरून कौतुक करत तिला भावी वाटचालीस शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले व प्रतिक्षा तिचे वडील बाळासाहेब बाबुराव देवकर व आई अनिता बाळासाहेब देवकर भाऊ शुभम बाळासाहेब देवकर , बहीण रोहिणी रवींद्र आग्रे यांचा शाल, श्रीफळ , हार , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. यावेळी प्रतिक्षा म्हणाली की जिद्द संघर्षाची तयारी आणि त्याल्या अभ्यासाची जोड असेल तर कुठल्याही परिस्थितीवर मात करता येते .या यशामागे माझे आई वडील व परिवार असल्याचे सांगत मी टाकळीची आहे याचा मला अभिमान आहे या विभागात काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे तालुक्या बरोबरच गावासाठी मोठे काम करणार असल्याचे सांगत सर्वाचे आभार व्यक्त केले.






