banner ads

दुचाकी कंटेनरचा अपघात एक ठार तर एक जखमी

kopargaonsamachar
0

 दुचाकी कंटेनरचा अपघात एक ठार तर एक जखमी


                     
मयत

कोपरगाव ( प्रतिनिधी  )
कोपरगाव शहरालगत नगर मनमाड महामार्गावरील राष्ट्रसंत सदगुरू जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शिर्डीच्या दिशेवरून येवल्याच्या दिशेने जाणाऱ्या HR 38AH 1061 या कंटेनरची MH 17 AH 1041 या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील हाफिज रफिक शाहा वय अंदाजे 34 राहणार येवला हे मयत झाले असून शिवाजी अर्जुन थोरात वय अंदाजे 53 हे जखमी झाले असून त्यांच्यावर एस जे एस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे 

यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फड हे घटनास्थळी दाखल होत पंचनामां करत मयत हाफिज शाहा यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून  कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई शहर पोलिस करत आहे तसेच पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!