महावितरण कोपरगाव ग्रामीण उपविभागाने केली विक्रमी वीजबील वसुली
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. कोपरगाव ग्रामीण उपविभागाने या वर्षामध्ये विजग्राहकांना उत्कृष्ठ व दर्जेदार आविरहित सेवा देत वापरलेल्या विजबिलाची विक्रमी वसुली केली आहे.
समर्पित भावनेने काम करणारे जनमित्र,बाह्य स्त्रोत कर्मचारी त्यांना पाठबळ व वेळोवेळी मार्गदर्शन करणारे वरिष्ठ अधिकारी त्यांना तितकीच मोलाची साथ देणारे सर्व शाखा अभियंता व बिलिंग विभाग या सर्वांच्या समन्वयातून केलेल्या कार्यामुळे कोपरगाव ग्रामीण उपविभागाने मार्च महिन्यात सर्व विक्रम मोडत विक्रमी वीजबिल वसुली करत वरिष्ठ कार्यालयाने दिलेले वसुलीचे उद्दिष्ट साध्य केले आहे.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या अतुलनीय कार्याबद्दल नुकताच आयोजित गुणगौरव सोहळा पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महावितरण कोपरगाव उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता .लक्ष्मण राठोड हे होते, तर प्रमुखअतिथी किरण जाधव प्रादेशिक सचिव कोकण प्रदेश हे होते, सदर कार्यक्रमास सुजित देशमुख , सहाय्यक अभियंता नाशिक, तुषार घोडगे, संचालक आर जे इलेक्ट्रिकल्स, मनीष फुगे, संचालक साई मनीष संगमनेर अभियंता यांनी आवर्जून सर्वांचे कौतुक केले, यावेळी उपकार्यकारी अभियंता बोलतांना म्हणाले आपण वीज ग्राहकांना दर्जदार व तत्पर सेवा द्यावी. जेव्हा आपण वीज ग्राहकाना दर्जेदार व तत्पर सेवा देत असतो, तेव्हा वीज ग्राहकाना सुध्दा वीज बील भरण्यासाठी प्रोत्साहन मिळत असते.सर्वांचे अभिनंदन करत उपकार्यकारी अभियंता यांनी ग्रामीणच्या सर्व कक्ष अभियंता,जणमित्र, बाह्य स्त्रोत कर्मचारी यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सर्वांचा गुणगौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या,तर प्रत्यक्ष केलेल्या कार्याबद्दल जणमीत्रांमधून धनंजय बद्रे सिताराम खंडागळे, अमर आव्हाड, विष्णू परसया यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सहायक अभियंता हर्षद बावा यांनी केले, तर आभार कनिष्ठ अभियंता अमोल बोडखे यांनी मानले, यावेळी महावितरण कोपरगाव ग्रामीण उपविभागातील शाखा अभियंता किशोर घुमरे, रविंद्र काकड ,योगेश सोनवणे,राहुल भालेराव, तेजेस बनकर, प्रशांत बोंडखळ, अनिकेत निर्भवणे यांच्यासह महिला सहाय्यक अभियंता रंजन करसाळे, कनिष्ठ अभियंता अंकिता भालेराव ,मयुरी पवार यंत्रचालक, कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, जनमित्र ,बाह्य स्त्रोत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





