banner ads

संजीवनीच्या सोळा विद्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड

kopargaonsamachar
0

 संजीवनीच्या सोळा विद्यार्थ्यांची  नोकरीसाठी निवड


 ट्रेनिंग  प्लेसमेंट विभागाची सालाबाद प्रमाणे दमदार कामगिरी
कोपरगांव ( लक्ष्मण वावरे )
 दरवर्षी  संजीवनी के.बी.पी. पॉलिटेक्निकच्या ट्रेनिंग अँड  प्लेसमेंट (टी अँड  पी) विभागाच्या प्रयत्नाने संजीवनीच्या शेकडो पदविका अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकऱ्या  मिळतात. चालु वर्षी  ही यशस्वी घौडदौड अविरतपणे चालु असुन अलिकडेच पुण्याच्या एल अँड  टी डीफेन्स कंपनीने मेकॅनिकल इंजिनिअरींगच्या अंतिम वर्षातील  सोळा विद्यार्थ्यांची त्यांच्या अंतिम निकाला अगोदरच नोकरीसाठी आकर्षक  पगारावर नोकरीसाठी निवड केली आहे, अशी  माहिती संजीवनी पॉलिटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

           एल अँड  टी डीफेन्स ने निवड केलेल्या विद्यार्थ्यांंमध्ये हर्षल अरूण गडाख, कृष्णा विकास कड, ओम नानासाहेब बागुल, प्रशांत  गणेश  टाके, ऋतुराज राजेंद्र लोखंडे, संकेत कैलास नजन, तेजस अरूण गोसावी, उबैद भट, विक्रम विजय भागवत, विवेक संपतराव जाधव, यश  चांगदेव वाकचौरे, आकाश  विजय उंडे, नंतुन कुमार, नरेश  कुमार, रामेश्वर  भाऊसाहेब भागवत व वैभव पंढरीनाथ चव्हाण यांचा समावेश  आहे.
          एल अँड टी डीफेन्स ही लार्सन अँड  टुब्रो या बहुराष्ट्रीय  कंपनीचा भाग असुन भारतीय संरक्षण दलास संरक्षण उपकरणे आणि विविध प्रणाली पुरविणारी कंपनी आहे. संजीवनीच्या विध्यार्थ्यांना कंपनीने देश  सेवेसाठी सीमेवर न जाता देश  सेवेची अप्रत्यक्ष संधी दिली आहे, हे अधोरेखित होत आहे. मागील वर्षी  याच कंपनीने सहा अभियत्यांची नोकरीसाठी निवड केली होती. त्यांनी प्रामाणिकपणे काम करून संजीवनी मधुन मिळालेल्या तांत्रिक ज्ञानाच्या जोरावर कंपनीच्या अधिकाऱ्यांची मर्जी संपादन करून संजीवनीचे वेगळेपण सिध्द केले. त्यामुळे कंपनीने चालु वर्षी  तब्बल सोळा विद्यार्थ्यांना चांगल्या पगाराची संधी दिली.  
        विध्यार्थ्यांची  नामांकित कपनीमध्ये नोकरीसाठी निवड झाल्याबध्दल संजीवनीचे अध्यक्ष  नितिनदादा काल्हे यांनी समाधान व्यक्त करून सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे पालकांचे अभिनंदन केले. तसेच मॅनेजिंग ट्रस्टी  अमित कोल्हे यांनी त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, विभाग प्रमुख प्रा. जी. एन. वट्टमवार, टी अँड  पी विभागाचेे प्रमुख प्रा. आय. के. सय्यद व समन्वयक प्रा. एन. एस. आहेर उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!