येसगाव विद्यालयाचा ८८.६० टक्के निकाल
कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
तालुक्यातील येसगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाचा एस एस सी परीक्षा २०२५ चा शेकडा निकाल ८८.६० टक्के एवढा लागला आहे.यात प्रथम कु.श्रावणी बापू कोल्हे ,द्वितीय कु.अंकिता दिलीप राहणे,तृतीय कु.तनुजा रमेश मोरे या विद्यार्थीनीनी बाजी मारली.
फेब्रुवारी, मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एस एस सी परीक्षेसाठी एकूण ७९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यामध्ये २२ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह २६ प्रथम श्रेणी १६ द्वितीय श्रेणी तर ६ विद्यार्थ्यांनी पास श्रेणी मिळवली आहे विद्यालयात प्रथम कु कोल्हे श्रावणी बापू.
४५२ /५००.९०.४० टक्के ,द्वितीय कु राहणे अंकिता दिलीप ४४९/५९९ ,८९.८० टक्के
तृतीय कु मोरे तनुजा रमेश ४४९/५००. ८९.८० टक्के गुण मिळविले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे मुख्याध्यापक,शालेय व्यवस्थापन समिती,ग्रामस्थ,पालकांनी अभिनंदन केले.




