banner ads

कोपरगाव बेट भागासाठीअर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर – ना. आशुतोष काळे

kopargaonsamachar
0

 कोपरगाव  बेट भागासाठीअर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर ना. आशुतोष काळे


कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
  राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी यापूर्वी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये अजून एका अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरची भर पडली असून कोपरगाव शहराच्या बेट भागासाठी महायुती शासनाच्या प्रस्तावास मान्यता देवून अजून एक अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली .

कोपरगाव शहरासाठी आरोग्य केंद्र मिळावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मान्यता देवून कोपरगाव शहरासाठी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहेत.कोपरगाव शहराची वाढती लोकसंख्या व शहरालागत असणाऱ्या उपनगरातील लोकसंख्येचा विचार करून शहरातील नागरिकांप्रमाणे उपनगरातील नागरिकांना देखील आरोग्य व्यवस्था मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी महायुती शासनाकडे प्रस्ताव सादर करून त्याबाबत त्यांचा पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याची दखल घेवून महायुती शासनाच्या प्रस्तावास केंद्र शासनाने मान्यता देवून अजून एक अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले असून या अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरचा फायदा कोपरगाव शहराच्या बेट भागातील नागरीकांना होणार आहे

कोपरगाव मतदार संघाच्या विकासाबरोबरच मतदार संघातील नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळवून २८.८४ कोटी निधी मिळविला असून १०० बेडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. ग्रामीण भागात संवत्सर प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाची मंजुरी मिळवून, माहेगाव देशमुख येथे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. तिळवणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजुरी व मढी बु. येथे नवीन प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांस मंजुरी मिळवत १.३० कोटी निधी मंजूर करून आणला आहे. आरोग्य व्यवस्था बळकट होण्याच्या दृष्टीने कोपरगाव शहराच्या बेट भागासाठी मंजूर करण्यात आलेल्या आणखी एका अर्बन हेल्थ वेलनेस सेंटरची भर पडली आहे. त्याबद्दल आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार,उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, जल संपदामंत्री तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.,आरोग्यमंत्री ना.प्रकाश आबीटकर यांचे आभार मानले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!