banner ads

निळवंडे धरणाचे पाणी रांजणगाव देशमुख परीसरात शेतकऱ्यांनी मानले आ. काळेंचे आभार

kopargaonsamachar
0

 निळवंडे धरणाचे पाणी रांजणगाव देशमुख परीसरात शेतकऱ्यांनी मानले आ. काळेंचे आभार


 कोपरगाव ( लक्ष्मण वावरे )
कोपरगाव मतदार संघाच्या जिरायती गावाला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाचे पाणी नियमितपणे जिरायती गावांमध्ये पोहोचत असून ज्या ज्यावेळी निळवंडेचे आवर्तन सुरु होते त्या त्यावेळी आ. आशुतोष काळे स्वत: लक्ष घालून हे पाणी सर्वच लाभधारक क्षेत्रातील गावांमध्ये पोहचवत आहे. याहीवेळी सुरु असलेल्या आवर्तनातून तळेगाव ब्रांचमधून रांजणगाव देशमुख व परीसरातील जिरायती गावांमध्ये निळवंडेचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे या गावातील नागरीकांना व शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

मागील कित्येक दशकापासून कोपरगाव मतदार संघातील जिरायती भागातील नागरिक निळवंडेच्या पाण्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते. निळवंडे धरणाच्या कालव्याच्या निर्मितीनंतर वितरीकांची कामे पूर्ण न झाल्यामुळे मतदार संघातील अनेक गावात सहजपणे निळवंडेचे पाणी येणे अशक्य होते. परंतु आ.आशुतोष काळे यांनी याबाबत पाटबंधारे विभागाकडे केलेला पाठपुरावा व वेळप्रसंगी स्वत:ची यंत्रना वापरून या जिरायती भागातील गावात निळवंडेचे पाणी पोहोचविले आहे. त्यामुळे ज्या जिरायती गावांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी टँकरवर आवलंबून रहावे लागत होते त्या जिरायती गावांना भर उन्हाळ्यात देखील पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवली नाही.
सध्या सुरु असलेल्या कवठे कमलेश्वर पॉईंट पासून सोडण्यात येणाऱ्या तळेगाव ब्रांचच्या चिंचोली येथून आ. आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार कोपरगाव मतदार संघातील रांजणगाव देशमुख व परीसरातील जिरायती गावांसाठी निळवंडेचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांमध्ये प्रचंड उत्साह व आनंदाचे वातावरण पसरले असून पाणी सोडण्यासाठी आ.आशुतोष काळे नेहमीच घेत असलेल्या पुढाकाराबद्दल या गावातील नागरीकांनी त्यांचे विशेष आभार मानले आहेत.

- निळवंडेचे पाणी प्रत्येक गावापर्यंत पोहोचलेच पाहिजे. प्रत्येक गावातील गावतळे, पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी सबंधित अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे. जेणेकरून चांगला पाऊस होईपर्यंत या गावातील नागरीकांना पिण्याच्या पाण्याची व काही प्रमाणात जनावरांच्या चाऱ्याची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घ्या.निळवंडे कालव्याचे पाणी जिरायती गावात पोहोचविण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या निळवंडे कालव्याच्या बोडखेवाडी पॉइंटपासून चर खोदण्याचे काम पूर्ण झाले असून त्या पॉइंटवरील सर्व बंधारे भरून द्या.

आ. आशुतोष काळे.


 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)
banner ads
banner ads

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!